By  
on  

अक्षय कुमार आपल्या बर्थ डे प्लॅनबाबत चाहत्यांशी केलं शेअर, म्हणतो ‘वाढत्या वयाची चिंता नाही’

सुपरस्टार अक्षय कुमार सध्या आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी स्कॉटलंडमध्ये आहे. यातच 9 सप्टेंबरला अक्षय त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये वाढत्या वयाची चिंता वाटत नसल्याचं सांगितलं आहे. 
अक्षय म्हणतो, ‘ प्रत्येक कलाकाराला कधीना कधी त्याच्या ग्लॅमरस जीवनातून बाहेर यावंच लागतं.

 

मला बॉलिवूडमध्ये 30 वर्षं झाली आहेत. कधी कधी हे स्वप्नवत वाटतं.’ अक्षयला सिनेमांच्या प्लॅनिंगबाबत विचारलं असता तो म्हणतो, ‘पत्नी ट्वींकलचा याबाबत काहीतरी प्लॅन असेलच. पण माझा मुलगा एक उत्तम कुक आहे.  त्यामुळे तो पिज्जा, चीजकेक किंवा सिनेमन बन बनवण्याची अपेक्षा आहे. अक्षय वाढदिवसादिवशीही शुटिंग करणार आहे. यावेळी बेल बॉटमच्या टीमनेही काहीतरी प्लॅनिंग केलं आहे. अक्षयसाठी वाढदिवसा निमित्त कुटुंब एकत्र असणं ही बाब महत्त्वाची आहे.’

Recommended

PeepingMoon Exclusive