By  
on  

अक्षयच्या मेंटॉरशिपमध्ये डेव्हलप होत असलेल्या Fau:G गेमशी सुशांत कनेक्शन ही अफवाच: टीमची स्पष्टोक्ती

भारतीय गेम निर्माता कंपनी  nCore Games  चे  को फाउंडर विशाल गोंडाल Fau:G या अ‍ॅक्शन गेमची घोषणा केली आहे. अक्षय या गेमचा मेंटॉर आहे.  या गेममधून मिळणारा 20 टक्के नफा भारत के वीर ट्रस्टला दिला जाईल. या गेमबाबत अशी अफवा समोर येत होती की ही संकल्पना सुशांत सिंग राजपुतची आहे. पण विशाल यांनी या अफवेवर विराम लावला आहे.

 

 

यावर त्यांनी एक स्टेटमेंट पब्लिश केलं आहे. यामध्ये ‘अक्षयच्या मेंटॉरशिपमध्ये डेव्हलप होत असलेल्या Fau:G गेमशी सुशांत कनेक्शन असल्याची केवळ अफवा आहे’ हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.  हा गेम ऑक्टोबरपर्यंत भेटीला येण्याची शक्यता आहे. गुगल प्ले आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरही हा गेम उपलब्ध आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive