By  
on  

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. आज तिसऱ्या दिवशी एनसीबीकडून रियाची चौकशी होत होती. त्यानंतर एनसीबीने रियाला अटक केली आहे. 

आज सायंकाळी करोना चाचणी करण्यासाठी तिला सायन रुग्णालयात नेण्यात येणार आहे. रियाला जेव्हा तिच्या अटकेची बातमी कळली तेव्हा ती ढसाढसा रडू लागली. तिला तिच्या आईशी बोलायचं होतं, परंतु ही परवानगी नाकारण्यात आली. 

 रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळेच एनसीबीने त्यांची कसून चौकशी करत त्यांना पुराव्यानिशी अटक केली. सुशांतचा नोकर दीपेश सावंतच्या चौकशीतून रियाचे नाव पुढे आले होते. त्यानंतर एनसीबीने रियाला चौकशीस हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते.

देशातील नामांकित आणि लोकप्रिय वकील सतीश माने शिंदे रियाची केस सांभाळत आहेत. त्यांनी याप्रकरणी प्रतिक्रीया दिली  आहे. ते म्हणतात देशातील तीन एजन्सीची एका महिलेवर ही दहशत आहे. तिचा गुन्हा फक्त एवढाच की तिने एका ड्रग एडीक्ट व्यक्तीवर प्रेम केलं. तो अनेक वर्षांपासून मानसिक उपचार घेत होता आणि त्यानंतर त्याने आत्महत्येचा मार्ग निवडला. सुशांतवर प्रेम करण्याची रियाला ही शिक्षा मिळतेय. 

रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला चार दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरु आहे. गेल्या आठ दिवसात एनसीबीने केलेली ही दहावी अटक आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive