By  
on  

 या प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण, मुंबईतील रुग्णालयात घेत आहे उपचार

कोरोना व्हायरसचा फैलाव सध्या वाढतच असल्याचं चित्र आहे. यातच मनोरंजन विश्वाचं काम सुरु असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारांना कोरोना झाल्याचं प्रमाणही वाढत असल्याचं दिसतय. जेव्हापासून चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे तेव्हापासून अनेक कलाकारांना कोरोना झाल्याचं समोर येत आहे. जवळपास दररोज एखाद्या कलाकाराला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर येतय.
नुकतच प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी ने त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर याविषयी सांगीतलं आहे. 

  हिमानी शिवपुरी यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. त्या लिहीतात की, “गुड मॉर्निग.. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचणी करुन घ्यावी.”
 

एका प्रसिद्ध वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हिमानी यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. त्या सांगतात की, “मी काही वेळापूर्वीच होली स्पीरिट रुग्णालयात दाखल झाली आहे. मला डायबिटीज सारखेही इतर आजार आहेत. तर यात मला डॉक्टारांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. नाहीतर मी घरातच क्वारंटाईन झाली असती.”
त्यांचे शुभचिंतक त्या लवकरच बऱ्या होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 


नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलेल्या हिमानी शिवपुरी यांनी अनेक नाटकांमध्ये काम करण्यासोबतच 1984मध्ये अब आयेगा मजा या सिनेमातून बॉलिवुड डेब्यू केला होता. त्यानंतर 'सूरज का सातवां घोड़ा', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ हैं', 'कभी खुशी कभी गम' 'कोयला’, ‘परदेस’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘अंजाम’ या आणि इतर बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्यांनी काही टीव्ही मालिकांमध्येही काम केलेलं आहे.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive