By  
on  

मल्याळम अभिनेत्याचं निधन, शूटींग सेटवरच बेशुध्द होऊन कोसळला

मल्याळम अभिनेता प्रबीश चक्कलवक्कल यांचं निधन झालं आहे. ते ४४ वर्षांचे होते. शूटींग दरम्यान ते सेटवरच बेशुद्ध होऊन पडले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.प्रबीश  यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. 

प्रबीश केरळ येथील कोचीमध्ये एका युट्यूब चॅनेलसाठी शूटींग करत होते. त्यादरम्यान ते बेशूध्द झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

 केरळमधील कचरा व्यवस्थापनाविषयी जनजागृती करणारा व्हिडिओ प्रबीश शूट करत होते. त्यांच्या शूटिंगचा काही भाग संपल्यानंतर सेटवरच ते कोसळले. त्याआधी त्यांनी आपल्या सहकलाकारांसोबत एक ग्रुप फोटोही काढला होता.  

 

 

प्रबीश यांनी अनेक  टेलिफिल्म्समध्ये काम केले असून डबिंग कलाकार म्हणून अनेक मल्याळम चित्रपटात काम केले आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive