By  
on  

Halahal Review: एका अनियंत्रित कथानकाच्या छायेत असलेला बरुण सोबती आणि सचिन खेडेकर यांचा उत्तम परफॉर्मन्स 

सिनेमा : हलाहल
ओटीटी : इरॉस नाऊ
कलाकार : बरुण सोबती, सचिन खेडेकर
दिग्दर्शक : रणदीप झा
रेटिंग : 3 मून्स

वैद्यकिय क्षेत्रातील घोटाळे हे भारतातील भितीदायक सत्य आहे. आणि हेच दाखवतो रणदीप झा याचा ‘हलाहल’ हा सिनेमा. एका वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थिनीच्या मृत्यूवर आधारित या सिनेमात एका वाईट घोटाळ्याची कहाणी सांगतो. या सिनेमात अभिनेता बरुण सोबती आणि सचिन खेडेकर मुख्य भूमिकेत आहेत. हा क्राईम थ्रिलर सिनेमा काही प्रमाणात रहस्यमयी आणि थ्रिलर निर्माण करणारा आहे. 
ही एका असहाय्य वडिलांची कहाणी आहे ज्यांना त्यांच्या मुलीच्या हत्येचं सत्य जाणून घ्यायचं आहे, मात्र काही शक्तिशाली लोकांनी त्याला आत्महत्या असं म्हटलेलं असत.


 गाझीयाबादमध्ये आधारित असलेला हा 1 तास 37 मिनीटांचा सिनेमा डॉक्टर शिव (सचिन खेडेकर) यांना त्यांची मुलगी अर्चनाच्या आत्महत्येची बातमी कळल्यापासून सुरु होतो. जी एक वैद्यकिय महाविद्यालयीन विद्यार्थीनी आहे. डॉक्टर शिव यांचा त्यांच्या मुलीने स्वत:चं आयुष्य संपवलय या गोष्टीवर विश्वास बसत नाही. आणि यात काहीतरी घोटाळा असल्याचा त्यांना संशय येतो. म्हणूनच हे असहाय्य वडिल पोलिस युसुफ कुरेशी (बरुण सोबती) ची मदत घेतात. आणि या प्रकरणात सत्य समोर आणण्यासाठी युसुफ हा शिवच्या मदतीने या केसचा छडा लावण्याचा प्रयत्न करतो. पण काही शक्तिशाली लोकं त्यांना या प्रकरणाच्या शेवटापर्यंत पोहोचण्यास थांबवतात. यानंतर जे काही घडतं ते मात्र प्रभावी वाटत नाही. या सिनेमाची कथा ही कंटाळवाणी वाटते आणि थ्रिलर असतानाही बरीच कमतरता जाणवते. सिनेमाची कहाणी अपेक्षेइतकी प्रभावीत करत नाही. कथेला उगाच ताणूनही शेवटी काही ठोस समोर येत नाही. मुख्य म्हणजे सिनेमाचा क्लायमॅक्स निराशाजनक वाटतो.

एक गोष्ट मात्र हलाहल या सिनेमाच्या वाईट लिखाणाला वाचवते ती म्हणजे बरुण आणि सचिन यांचा उत्तम परफॉर्मन्स. बरुण हा नेहमी प्रमाणे त्याच्या पोलिस इन्स्पेक्टर युसूफच्या भूमिकेत प्रभावी काम करताना दिसतो. त्याची हरयाणवी पोलिसाची भाषाशैली, बोली ही उत्तम वाटते. सचिन यांनीही त्यांच्या भूमिकेत उत्तम काम केलं आहे. त्यांनी भावुक सीन उत्तम वठवले आहेत, शिवाय त्यातून सिनेमातील रहस्य कायम ठेवलय. इतर सहकलाकारांचही चांगलं काम पाहायला मिळतय.

पिपींगमून या कलाकारांच्या उत्तम परफॉर्मन्ससाठी जास्तीचे 5 मून्स समर्पित करतात जे एका अनियंत्रित आणि न पटणाऱ्या क्लायमॅक्सने खाली पाडले आहेत.  दिग्दर्शक रणदीप झा यांनी ‘हलाल’ला एक चांगला क्राईम सिनेमा  बनवण्यासाठी प्रत्येक चांगली युक्ती लढवल्याचं पाहायला मिळतय पण झीशान काद्री यांच्या लिखाणाने हा सिनेमा खाली पाडला आहे. हे निराशाजनक आहे कारण याच व्यक्तिने ‘गँग्ज ऑफ वासेपुर’ सारख्या सिरीजसाठी सह-लेखक म्हणून काम केलं होतं. पियुष पुटी यांची चांगली सिनेमॅटोग्राफी पाहायला मिळते. मात्र नितीश भाटिया यांच्या एडिटींगने सिनेमा काही ठिकाणी विचित्र वाटतो. 
जर तुम्ही बरुण सोबती आणि सचिन खेडेकर यांचे चाहते नसाल तर ‘हलाहल’ हा सिनेमा वगळता येऊ शकतो.

Recommended

PeepingMoon Exclusive