By  
on  

अनुराग कश्यप यांच्यासोबत रिचा चढ्ढाही पायल घोषविरोधात लीगल अ‍ॅक्शन घेणार, जाणून घ्या

‘पटेल की पंजाबी शादी’ फेम पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तिने ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींना टॅग करत मदतीची अपेक्षा केली आहे. यावेळी आरोप करताना तिने ऋचा चड्ढा, हुमा कुरैशी, माही गिल यासोबत आणखी इतरही अभिनेत्रींचं नाव घेतलं आहे. 

 

 

पायलच्या आरोपावरून रिचा चढ्ढाने तिच्याविरोधात लीगल अ‍ॅक्शन घेण्याचं ठरवलं आहे. यावेळी रिचाच्या वकिलाने या प्रकरणात नाहक तिचं नाव गोवल्याचं स्टेटमेंट जारी केलं आहे. ‘कोणत्याही महिलेला खोट्या आरोपांनी त्रास दिला जाण्याचा प्रयत्न केला जाऊ नये.’ असं या नोटिशीमध्ये म्हटलं आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Here is the statement from my lawyer @priyankakhimani on my behalf .. thank you

A post shared by Anurag Kashyap (@anuragkashyap10) on

 

इकडे अनुरागनेही त्याच्यावरचे आरोप फेटाळत वकिलामार्फत एक स्टेटमेंट जारी केलं आहे. ‘माझे अशील अनुराग कश्यप यांना लैंगिक शोषणाच्या खोट्या आरोपामुळे दु:ख झालं आहे. सामाजिक आंदोलन #Metoo चा हेतू स्वत:च्या स्वार्थासाठी वापरलं जात आहे. त्यामुळे या आंदोलनाचा मुळ हेतू पुसला जात आहे. माझे अशील या खोट्या आरोपांविरोधात त्यांची न्यायिक लढाई लढतील.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive