By  
on  

अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी केली करोनावर मात, शेअर केली पोस्ट

सहा महिने होऊन गेले तरी करोनाचं थैमान थांबताना दिसत नाही. दररोज अनेकजण या साथीच्या कचाट्यात सापडताना दिसत आहेत. सिनेसृष्टीतील कलाकारही याला अपवाद नाहीत. प्रसिद्ध अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनाही काही दिवसांपुर्वी करोना झाल्याचं समोर येत होतं.

 

 

‘ गुड मॉर्निग.. मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की, मी कोरोना व्हायरस संक्रमित आहे. जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचणी करुन घ्यावी’ असं आवाहन करत हिमानी शिवपुरी यांनी इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली होती. पण आता त्यांनी करोनावर मात केली आहे. 
आपल्या नव्या पोस्टमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत. आपले कोविड वॉरिअर्स, हॉस्पिटलमधील स्टाफचे खरच आभार. मी पुन्हा होम क्वारंटाइन झाले आहे. तुम्हा सर्वांच्या सकारात्मक शुभेच्छांसाठी धन्यवाद ही पोस्ट त्यांनी यावेळी शेअर केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive