By  
on  

पॉपकॉर्न विकणा-या मुलाच्या ऑनलाईन शिक्षणासाठी सोनू सूदचा मदतीचा हात

म्हणतात ना , माणसांत पण देव असतो. बॉलिवूड  अभिनेता सोनू सूद ने अवघ्या जगाला हे दाखवून दिलं आहे. रिअल हिरोची उपाधी तो सार्थ ठरवतोय.  लॉकडाऊनच्या काळात हजारो प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदचं मदत कार्य विविधप्रकारे सुरुच आहे. त्यामुळे तो आपसूकच चर्चेत येतो. त्याला प्रसिध्दीचा कुठलाही हव्यास नाही. तो मनापासून गरजूंची मदत करतो, हेच वेळोवेळी पाहायला मिळतं. 

 सोनूने पॉपकॉर्न विकणाऱ्या एका मुलाला नुकतीच मदत केली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षणाच्या काळात हा मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सोनूने त्याला मोबाईल गिफ्ट करत त्याचं शिक्षणाप्रती मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे. 

ट्विटरवर एका यूजरने सोनू सूदकडे पॉपकॉर्न विकणाऱ्या मुलाला ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी स्मार्टफोन घेऊन देण्याची विनंती केली होती. ‘सर कृपया याची मदत करा. हप्पी त्याच्या वडिलांना मदत करण्यासाठी पॉपकॉर्न विकत आहे. मी त्याला नेहमीच शाळेच्या फीसाठी मदत करतो. परंतु आता ऑनलाईनचा जमाना आहे. पण स्मार्टफोन नसल्याने तो ऑनलाईन क्लास अटेंड करु शकत नाही.

सोनूला हे कळताच त्याने हप्पीला 10 तासांच्या आत स्मार्टफोन घेऊन दिला. यानंतर या यूजरने सोनू सूदचे आभार मानणारी पोस्ट केली. 

 

 

 

सोनूलासुध्दा हप्पीच्या शिक्षणाबद्दल आनंदच होत आहे. तो त्याला हसत ट्विटरवर  म्हणतोय, तु लवकरच पॉपकॉर्न तयार ठेव मी खायला येतोय. त्यामुळे अशाप्रकारे तळागाळातील लोकांसाठी वंचितांसाठी सोनू सूद हा देवाप्रमाणे धावून येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive