By  
on  

करोनातून बरं झाल्यानंतर अर्जुन कपूर करणार प्लाझ्मा डोनेट

अभिनेता अर्जुन कपूरने काही दिवसांपुर्वीच करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं. सध्या अर्जुन होम आयसोलेशनमध्ये आहे. यादरम्यान त्याने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. अर्जुनने करोनातून बरं झाल्यानंतर प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. लिडिंग वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, अर्जुनशी संबंधित असलेल्या एका डॉक्टरांनी ही बाब स्पष्ट केली आहे.

 

 अर्जुन करोनामधून बरा झाल्यानंतर 45 दिवसांनी प्लाझ्मा दान करणार आहे. आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो. असे निर्णय अनेकांना प्रेरणा देऊ शकतात. यासाठी अर्जुनला सिटी हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आहे. आम्ही सध्या याबाबी अधिक स्पष्ट करत आहोत.  अर्जुनच्या या निर्णयाने अनेकांना प्रेरणा मिळेल. त्यामुळे अनेकजण प्लाझ्मा दानासाठी पुढे येतील. अशा पद्धतीनेच या व्हायरसला हरवणं शक्य आहे.’ असं या आरोग्य अधिका-यांनी स्पष्ट केलं.

Recommended

PeepingMoon Exclusive