काजोल आणि तनीषाने आई तनुजाला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा या आज 77 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या मुली काजोल आणि तनीषा मुखर्जी या दोघींनीही आईच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर खास पोस्ट केल्या आहेत आणि आई तनुजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
काजोलने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असं लिहीलं की, “जेव्हा मी तुझ्यासोबत असते तेव्हा माझ्यासोबत पूर्ण सेना असते. त्या व्यक्तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा जिने मला महिलांचे सगळे अवतार दाखवले. योद्धा, पत्नि, आई, बहिण, महिला, माणूस आणि एक आत्मा. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा मम्मा. तुला माझं खुप प्रेम. मी यासाठी मनापासून आभारी आहे की तू मला मुलगी म्हणून निवडलस.”

 

 काजोलची लहान बहिण आणि अभिनेत्री तनुजा मुखर्जीने देखील आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तनुजा यांचा किशोर कुमार यांच्यासोबतचा आणि आई तनुजासोबतचे स्वत:चे फोटो पोस्ट करून तनीषाने आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

तनुजा यांच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्यांनी अनेक उत्तमोत्तम काम केलेलं आहे. 'हाथी मेरे साथी', 'बंदीश', 'अनोखा रिश्ता', 'जेवेल थीफ', 'जीने की राह', 'सुहागन'  'स्वर्ग नरक' यासह अनेक सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम भूमिका साकारल्या होत्या.

Recommended

Loading...
Share