माधुरीला येत आहे या थ्रोबॅक ट्रीपची आठवण, फोटो केला शेयर

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत सध्या कुठेही बाहेर हिंडण्यासाठी जाता येत नसल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. धकधक गर्ल माधुरीचीही अशीच अवस्था आहे. माधुरी दीक्षितला फिरण्याची, हिंडण्याची प्रचंड आवड आहे. मात्र कोरोनाग्रस्त परिस्थितीत ही आवड पूर्ण करणं मात्र माधुरीला कठीण जात आहे. मात्र लॉकडाउनच्या काळापासून आता अनलॉक होईपर्यंत माधुरीने सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिच्या थ्रोबॅक आठवणींना उजाळा दिला आहे.

माधुरीने नुकताच तिच्या एका फॅमिली ट्रिपचा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये माधुरी लिहीते की, "कुटुंबासोबतचा वेळ हा घालवलेला चांगला वेळ असतो."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Time with family is the time well spent ‍‍‍ #ThowbackToFamilyTrips

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

माधुरी अनेकदा तिच्या परिवारासोबत विविध ठिकाणी फिरत असते. मात्र सध्या अशाच विविध ट्रीपच्या आठवणी माधुरी जागवतेय.

सध्या माधुरी तिच्या कुटुंबासोबत घरीच आहे. मात्र कुकिंग, गायन, म्युझिक या तिच्या आवडी सध्या माधुरी जोपासत आहे. सध्या माधुरी सोशल मिडीयावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. शिवाय  तिच्या युट्यूब चॅनेलसाठीही माधुरी विविध व्हिडीओ करताना दिसत आहे. लॉकडाउनच्या काळात माधुरीने स्वत:चा सिंगल अल्बमही रिलीज केला होता. यातून माधुरीचं गायनकौशल्य पाहायला मिळालं होतं.

Recommended

Loading...
Share