By  
on  

Guns of North: महेश मांजरेकर करणार आयुष शर्माच्या सिनेमाचं दिग्दर्शन, पण सलमानचा समावेश नाही?

मराठी सिनेमांचे प्रसिध्द दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एका नव्या सिनेमाची दिग्दर्शक म्हणून धुरा सांभाळणार आहेत, असं समजतंय. पण हा मराठी सिनेमा नाही. प्रवीण तरडे लिखित-दिग्दर्शित  मराठीतील सुपरहिट सिनेमा 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक ‘गन्स ऑफ नॉर्थ’ लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे, हे आपण जाणतो. सलमान खानच्या बहिणीचा पती आणि अभिनेता आयुष शर्मा यात प्रमुख भूमिकेत आहे. म्हणजेच ओम भूतकरने साकारलेली भूमिका तो करतोय. याच सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करतायत. यासाठीचे अभिनयाचे काही वर्कशॉप महेश मांजरेकर आयुषसोबत येत्या ऑक्टोबरपासून घेणार असून नोव्हेंबरपर्यंत हा सिनेमा फ्लोअरवर जाईल.

आधी सलमानसुध्दा या सिनेमात एका पोलिस अधिका-याची भूमिका साकारत असल्याच्या चर्चा होत्या, परंतु सलमानचा या सिनेमात आता समावेश नसल्याचं कळतंय. 

महत्त्वाचं म्हणजे या सिनेमात दाक्षिणात्या इंडस्ट्रीतील अनेक प्रसिध्द चेहरे झळकणार असल्याच्या बातम्या आहेत,त्यामुळे हा सिनेमा तिथेही चांगला बिझनेस करु शकतो. 
यापूर्वी आयुषचा लव्हयात्री हा रोमॅण्टिक सिनेमाने सलमान खान फिल्मद्वारे प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु बॉक्स ऑफीसवर त्याला अपयश मिळालं नाही.  

 

Recommended

PeepingMoon Exclusive