या सिनेमाच्या निमित्ताने काजोल पहिल्यांदाच गेली होती कश्मीरला, सिनेमाला 21 वर्षे पूर्ण

By  
on  

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण हे ऑफस्क्रिन कपल बऱ्याच ऑनस्क्रिन झळकलं आहे. यापैकीच एक सिनेमा म्हणजे 'दिल क्या करे'. या सिनेमातही काजोल आणि अजय देवगण जोडी पाहायला मिळाली होती. या सिनेमात काजोलशिवाय महीमा चौधरीदेखील होती. या सिनेमाचं चित्रीकरण कश्मीर येथे करण्यात आलं होतं. याच सिनेमाला नुकतेच 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काजोलने या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. 

काजोलने सोशल मिडीयावर पोस्ट करून या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. काजोल तिच्या पोस्टमध्ये लिहीते की, "पहिल्यांदाच मी कश्मीरला गेले होते. किती सुंदर जागा आहे. लव्ह स्टोरीसाठी एकदम परफेक्ट तुम्हाला नाही वाटत ?"

 

यासोबतच 'दिल क्या करे'ची 21 वर्षे असा हॅशटॅग वापरुन काजोलने ही पोस्ट केली आहे. कश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे कौतुक करत काजोलने या सिनेमाची आठवण शेयर केली आहे. जम्मू - कश्मीर या ठिकाणचं सौंदर्य सगळ्यांना भावतं. काजोलनेही या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान कश्मीरच्या सौंदर्याची मजा लुटली होती. या सिनेमाच्या निमित्ताने काजोल पहिल्यांदाच कश्मीरला गेली असल्याचं पोस्टमध्ये लिहीते.

Recommended

Loading...
Share