लवकरच पार पडणार संजय दत्तची तिसरी केमोथेरपी

By  
on  

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा कर्करोग आहे. संजय सध्या कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत आहे. त्याच्या केमोच्या 2 सायकल पुर्ण झाल्या आहेत. आता संजय तिस-या केमोसाठी तयार होताना दिसत आहे. त्यासाठी त्याला लवकरच दुबईवरून परत यावं लागेल. 

रिपोर्ट्स नुसार 30 सप्टेंबरला केमोसाठी मुंबईमध्ये असणं गरजेचं आहे. पण त्याने दुबईमधील मुक्काम लांबवल्यास हे पुढे जाऊ शकते. यासंदर्भात डॉक्टर जलील पारकर म्हणतात, ‘ सध्या त्यांना किती केमो दिले जाणार आहेत हे स्पष्ट नाही. संजय दत्तचा हा प्रवास भलताच कठीण आहे. 
 ट्रीटमेंट दरम्यान तो सगळे प्रोफेशन कमिटमेंट पुर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. संजय दत्त 'केजीएफ: 2', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', 'तोरबाज', 'शमशेरा' या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

Recommended

Loading...
Share