‘बॉबी डार्लिंग’चा संसार अडचणीत, घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल

‘बिग बॉस’ या शोमधून तसेच ‘फॅशन’, ‘चलते चलते’, ‘क्या कूल है हम’ या सिनेमातून समोर आलेली बॉबी डार्लिंग अर्थात पाखी शर्माने न्यायालयात घटस्फोटसाठी अर्ज दाखल केला आहे.

‘बिग बॉस’ या शोमधून तसेच ‘फॅशन’, ‘चलते चलते’, ‘क्या कूल है हम’ या सिनेमातून समोर आलेली बॉबी डार्लिंग अर्थात पाखी शर्माने न्यायालयात घटस्फोटसाठी अर्ज दाखल केला आहे. पती रमणीक शर्मा विरोधात तिने शारिरीक आणि मानसिक छळाची तक्रारही दाखल केली आहे. बॉबी अर्थात पाखी शर्माचं मूळ नाव पंकज शर्मा आहे. त्याने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करून घेतली.

२०१६मध्ये बिल्डर रमणिक शर्माशी लग्न केल्यानंतर काही दिवसातच दोघांमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. बॉबीने पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि अनैसर्गिक शारिरीक संबंधासाठी दबाव टाकल्याची तक्रार दाखल केली. तिने वांद्रे कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.

‘आमचं लग्न नोंदणीकृत नसल्याने बेकायदेशीर’ असल्याचा दावा तिच्या पतीने केला आहे. तर दारूच्या नशेत पतीने मारहाण केली आणि पैसेदेखील काढून घेतले असा आरोप बॉबीने केला आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of