‘राजी’ सिनेमाचा सीक्वेल येणार? पाहा काय म्हणतात हरविंदर सिक्का

२०१८ मध्ये उत्तम सिनेमांच्या यादीत राजी सिनेमाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आलिया भट्ट, विकी कौशल यांच्या अभिनयाने सजलेला राजी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरला.

 

२०१८ मध्ये उत्तम सिनेमांच्या यादीत राजी सिनेमाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. आलिया भट्ट, विकी कौशल यांच्या अभिनयाने सजलेला राजी प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरला. हरविंदर सिक्का यांच्या ‘कॉलिंग सहमत’ या सत्यकथेवर आधारित बनलेल्या या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

या सिनेमासाठी अलियाला देखील फिल्म फेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आलियाने यात भारतीय गुप्तहेराची भूमिका अत्यंत उत्तमरित्या वठवली होती. सहमत नावाची भारतीय गुप्तहेर पाकिस्तानचे भारतविरोधी बेत जाणून घेण्यासाठी ती पाकिस्तानी लष्करातील अधिका-याशी लग्न करते. तिचा गुप्तहेर, पत्नी आणि सून या नात्यांधील प्रवास या सिनेमात अत्यंत उत्तम पद्धतीने मांडला आहे.

या सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचा विचार सुरु असल्याचं हरिविंदर सिक्का यांनी सांगितलं. हा दुसरा भाग ‘रिमेंम्बरींग सहमत’ या नावाने येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात आलियाशी देखील बोलले. आलियालाही या संकल्पनेत रस असल्याचे समजलं. त्यामुळे रसिकांना लवकरच राजीचा सिक्वेल बघायला मिळेल यात शंका नाही.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of