राजश्री प्रॉड्क्शन रसिकांसमोर आणणार मैत्रीवर आधारलेला सिनेमा ‘हम चार’, ट्रेलर झाला रिलीज

राजश्री प्रॉड्क्शन दर्जेदार कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखलं जातं. पण यावेळी मात्र राजश्रीने मैत्रीची संकल्पना समोर ठेवून एक नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला आहे. ‘हम चार’ असं या सिनेमाचं नाव आहे.

राजश्री प्रॉड्क्शन दर्जेदार कौटुंबिक सिनेमांसाठी ओळखलं जातं. भारतीय कुटुंबव्यवस्थेचं सुंदर चित्रण राजश्रीच्या सिनेमांमध्ये असतं. पण यावेळी मात्र राजश्रीने मैत्रीची संकल्पना समोर ठेवून एक नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला आहे. ‘हम चार’ असं या सिनेमाचं नाव आहे.
हा सिनेमा तीन मित्र आणि एक मैत्रीण अशा चौघांच्या मैत्री आणि दुराव्यावर आधारलेला आहे. नमित, सुरजो, अबीर आणि मंजरी अशा चार मित्रांच्या एकमेकांवरच्या रागापासून या ट्रेलरची सुरुवात होते. जो तो प्रत्येकाला दोष देताना दिसतो. पण या दुराव्यातही ते एकमेकांची संपूर्ण खबर घेत असतात. हे लक्षात आणून दिल्यावर त्यांना मैत्रीच्या चिवट बंधाची आठवण होते. प्रित कमानी, सिमरन शर्मा, अन्शुमन मल्होत्रा आणि तुषार पांडे हे नवे चेहरे या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येतील.
राजश्रीने जवळपास तीन वर्षांनंतर हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आणला आहे. यापूर्वी राजश्रीचा ‘प्रेम रतन धन पायो’ हा सिनेमा आला होता. राजश्रीचा ‘ऑल टाईम फेव्हरिट सलमान’ या सिनेमात असेल की नाही हे कळावयास मार्ग नाही.

 

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of