भावुक झाला सुपरस्टारमधील पिता, रजनीकांत यांनी केलं सौंदर्याचं कन्यादान

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या आणि व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी यांचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. चेन्नईमधील लीला पॅलेस इथे हा शाही विवाहसोहळा पार पडला.

सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या आणि व्यावसायिक आणि अभिनेता विशगन वनानगामुडी यांचा विवाहसोहळा सोमवारी पार पडला. चेन्नईमधील लीला पॅलेस इथे हा शाही विवाहसोहळा पार पडला. यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील बरेच कलाकार उपस्थित होते. सौदर्या आणि विशगन या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. सौदर्याचा यापुर्वी चेन्नईमधील व्यवसायिक अश्विन याच्यासोबत लग्न केलं होतं. पण अश्विन याच्याशी न पटल्याने दोघांनी २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. सौंदर्याला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे.

सौदर्या उत्तम दिग्दर्शक आहे. याशिवाय अनेक सिनेमांची निर्माता पण आहे.  विशगन एका आघाडीच्या कंपनीचा कार्यकारी संचालक आहे. इंग्लडमध्ये विशगन यानं आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. विशागन ‘वंजागर उल्लघम’ या चित्रपटात काम केलं आहे. शुक्रवारी सौंदर्याची प्री-वेडिंग रिसेप्शन पार पडलं.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of