दीप-वीरच्या रिसेप्शनची आमंत्रण पत्रिका तुम्ही पाहिलीत का?

लग्नात दीप-वीरच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असले तरी लग्नाचे रिसेप्शन दोन ठिकाणी होईल

बॉलिवूड लव्हबर्ड्स दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. 14 आणि 15 नोव्हेंबरच्या या विवाहसोहळ्यासाठी दोघेही आपल्या नातेवाईकांसोबत इटलीला रवाना झाले आहेत. संपूर्ण बॉलिवूड आणि त्यांच्या चाहत्यांना आता त्यांच्या या खास दिवसाची उत्सुकता लागून राहिली आहे.

पण महत्त्वाचं म्हणजे, लग्नात दीप-वीरच्या फक्त नातेवाईक आणि फार जवळच्या मित्रपरिवाराला निमंत्रित करण्यात येणार असून हा फारच खासगी सोहळा असेल. तसंच त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन दोन ठिकाणी होईल. बॉलिवूड आणि इतर काही मित्रपरिवारासाठी मुंबईत तर बंगळूर येथे दीपिकाच्या कुटुंबियासाठी रिसेप्शन आयोजित करण्यात येईल.

दीप-वीरचे लग्न जरी इटलीत होत असेल तरी त्यांचे ग्रॅंड रिसेप्शन मुंबईत होणार आहे. 28 नोव्हेंबर 2018 ला सायंकाळी 8 वाजता रिसेप्शनला सुरुवात होणार आहे. या पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of