सलमान खानच्या घरी बोनी कपूरला नो एन्ट्री

सलमान खान आणि बोनी कपूर यांच्यात सर्वकाही आलबेल असताना त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला, याचंच सर्वांना आश्चर्य वाटत आहे

2018 वर्षात बॉलिवूडमधल्या अनेक जोड्यांनी विवाहबंधनात अडकत आपल्या नात्याला पूर्णत्व दिलं तर अनेक जोड्या एकत्र दिसल्याने चर्चेच्या विषय ठरल्या. त्यामुळे त्यांच्यात काहीतरी शिजतंय अशा चर्चांना आणखी उधाण आलं आहे. यापैकी एक सर्वात चर्चा झालेली जोडी ती म्हणजे अरबाज खानची पूर्व पत्नी मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर. या जोडीला गुपचूप आणि सार्वजनिकरित्या अनेकदा एकत्र पाहण्यात आलं. हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा पण ब-याच रंगल्या.

प्रेम करुया खुल्लम खुल्ला या उक्तीप्रमाणे जरी मलायका आणि अर्जुन फिरत असले तरी त्यांच्या घरच्यांना त्यांचं हे नातं अजिबात मान्य नसल्याचं दिसतंय. दोघांच्याही कुटुंबीयांमध्ये सध्या नाराजीचा सूर उमटला आहे, याचंच एक उदाहरण म्हणजे बॉलिवूड दबंग सलमान खानने अर्जुन कपूर आणि त्याचे वडील बोनी कपूर यांच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे बंद केले आहेत. सलमानच्या जवळील सूत्रांनी सांगितल्यानुसार, अर्जुन यापूर्वी सलमानची बहिण अर्पिता खानला डेट करत होता. त्यानंतर त्याने तिच्यासोबतचं नातं तोडून टाकलं आणि अरबाजची पत्नी मलायकासोबत मैत्री केली आणि आत्ता तिच्यासोबत तो लग्न करणार आहे,अशीही चर्चा आहे त्यामुळे सलमानने असा टोकाचा निर्णय घेतलाय.

याचेच परिणामसुध्दा आता चांगलेच दिसू लागले आहेत. सलमानने कोणतही कारण न देता बोनी कपूरच्या ‘वॉंटेड 2’ आणि ‘नो एन्ट्री’च्या सिक्वलमधून काढता पाय घेतला आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of