सलमान खान लवकरच करणार टी. व्ही. चॅनेल लॉंच, कपिलचा शो स्थानांतरित होणार?

एका प्रसिद्ध वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार सलमान खान लवकरच स्वत:चं टिव्ही चॅनेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. स्वत:च्या बॅनरख़ाली सिनेमा आणि ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केल्यानंतर सलमानने हा निर्णय घेतला आहे.

एका प्रसिद्ध वेबसाईटवरुन मिळालेल्या माहितीनुसार सुपरस्टार सलमान खान लवकरच स्वत:चं टिव्ही चॅनेल लॉंच करण्याच्या तयारीत आहे. स्वत:च्या बॅनरख़ाली सिनेमा आणि ‘द कपिल शर्मा शो’ची निर्मिती केल्यानंतर सलमानने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच सलमान या चॅनेलसाठी मोठया प्रमणावार कंटेंटच्या शोधात आहे. या चॅनेलच्या लॉंचनंतर कपिलचा शोही नव्या चॅनेलवर दाखवला जाईल यात शंका नाही.

याशिवाय सलमान एका ‘बीईंग चिल्ड्रन’नावाचा ब्राण्डदेखील लॉंच करणार आहे. यामध्ये प्री-प्राइमरी टू डे-केयरशी संबंधित गोष्टींचा समावेश असेल. सलमान सध्या ‘भारत’च्या निर्मितीमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा ईददिवशी रिलीज़ होत आहे. यानंतर तो ‘दबंग ३च्या शूटिंग ला सुरूवात करेल.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of