Exclusive: ‘बंटी और बबली’च्या सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीची प्रमुख भूमिका

'बंटी और बबली' या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कोण काम करणार याविषयी सिनेवर्तुळात उत्सुकता आहे

‘बंटी और बबली’ या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कोण काम करणार याविषयी सिनेवर्तुळात उत्सुकता आहे. पिपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सीक्वेलमध्ये अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी काम करणार आहे. सिद्धांतने याआधी ‘गल्ली बॉय’ सिनेमात एमसी शेर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती आणि त्याला एक वेगळी ओळख मिळाली.

पिपिंगमुनला मिळालेल्या माहितीनुसार आदित्य चोप्रा आणि यश राज फिल्म यांनी २००५ साली आलेल्या ‘बंटी और बबली’ या सुपरहिट सिनेमाचा सीक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

यश राज फिल्मस यांनी या सीक्वेलसाठी सिद्धांतच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तसेच सिद्धांतसोबत एक नवीन अभिनेत्री काम करण्याची सुद्धा शक्यता आहे. या सीक्वेलमध्ये अमिताभ बच्चन पहिल्या भागाप्रमाणे पोलीस अधिकारी दशरथ सिंह ही भूमिका साकारणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of