महाराष्ट्राचा वाघ आला…’ म्हणत ठाकरे सिनेमातील पहिलं मराठी गाणं रिलीज

हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लाभलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील सिनेमा ‘ठाकरे’ रिलीज व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या सिनेमाची वाट पाहत असलेल्या रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लाभलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील सिनेमा ‘ठाकरे’ रिलीज व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या सिनेमाची वाट पाहत असलेल्या रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

विशेष म्हणजे या सिनेमातील पहिलं मराठी गाणं रिलीज झालं आहे. अत्यंत जोशपूर्ण अशा या गाण्याने तरुणाईला आकर्षित केलं आहे. २५ जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत आहे अभिनेत्री अमृता राव माँसाहेब मीनाताई ठाकरेंच्या प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तांत्रिक विभागाची टीम ह्या चित्रपटाच्या अनुषंगाने काम करेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलं आहे.

हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी सिनेमाचा म्युझिक रिलीज सोहळा अलीकडेच ठाकरे कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. मराठीमधील गाण्याला स्वरसाज अवधूत गुप्ते यांनी चढवला आहे. मंदार चोळकर यांनी हे गाणं लिहिलं आहे.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of