By  
on  

एडव्होकेट आर्या आणि टोन्याचा हा धम्माल व्हिडीओ पाहून तुम्ही हसू आवरु शकणार नाही

डॉ.अजितकुमार उर्फ देवी सिंगच्या मुसक्या आवळण्यासाठी एसीपी दिव्या मॅडमसोबतच कोर्टाच्या रणांगणात नेटाने लढा देण्यासाठी एडवोकेट. आर्या यांची एन्ट्री झाल्याने देवमाणूस मालिकेत अनेक उत्कंठावर्धक वळणं येत आहेत.
 

देवी सिंगला कसे त्याचे गुन्हे त्याच्याकडून कबूल करुन घ्यायचे आणि त्याला त्याची कशी कठोर शिक्षा होईल यासाठी आर्या एक जबाबदार वकील म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करतेय. पण देवी सिंगला म्हणजे डॉ. अजितकुमारला या त्याच्या कुकर्मापासून वाचविणयासाठी डिंपल खुप मदत करतेय, तिला मोठी अभिनेत्री व्हायचंय त्यासाठी डॉक्टरच्या पैशांचा तिला उपयोग होणार आहे, म्हणूनच ती त्याला त्याच्या प्रत्येक षड्यंत्रात त्याची साथ देतेय. पण डिंपल व अजितकुमारचा प्रत्येक डाव दिव्या आणि आर्या हाणून पाडणार असंच दिसतंय. 

पण वकील आर्या फेम अभिनेत्री सोनाली पाटील देवमाणूसच्या सेटवर आल्यापासून ती नुसती धम्माल करतेय. सर्व सहकलाकारांसोबत भन्नाट रील्स ती शेअर करतेय. आत्तासुध्दा सोनालीने टोन्यासोबतचा एक जबरदस्त रील व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

 

टोन्या आणि सोनालीच्या या भन्नाट  व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive