श्रेयस तळपदेचा नवा लूक पाहिला का, झळकणार हिंदी या मालिकेत

By  
on  

अभिनेता श्रेयस तळपदे अभिनयात वेगवेगळे प्रयोग नेहमी करत असतो. आता तो एका गॅंगस्टरच्या रुपात रसिकांसमोर येत आहे. ‘माय नेम इज लखन’ या मालिकेत श्रेयस एक गुंडाची भूमिका साकारत आहे.

लखन हा मोठ्या डॉनसाठी काम करणा-या गुंडाची व्यक्तिरेखा साकारत आहे. पण अचानक एक प्रसंग घडतो आणि लखन सुधारण्याचं ठरवतो. विशेष म्हणजे संजय नार्वेकर यात डॉनच्या भूमिकेत दिसून येत आहे.

लखनच्या गेटअप मधील श्रेयसचा लूक मात्र एखाद्या कॉलेजमधील युवकासारखाच आहे. श्रेयसचा हा लूक अनेकांना आवडत आहे. लखनची व्यक्तिरेखा इतर गुंडाप्रमाणे नाही तर गुन्हेगारी जगतात असूनही त्याने चांगुलपणा आणि प्रामाणिकपणा कायम आहे.

श्रेयस खुप दिवसांनी छोट्या पडद्यावर दिसत आहे. आपल्या हिंदीमधील पदापर्णाबद्दल श्रेयस बराच उत्साहित आहे. आता माय नेम इज लखन मधून श्रेयस त्याची जादू चालवण्यात सफल होतो का ते लवकरच दिसून येईल.

https://twitter.com/sabtv/status/1080392314093228032

Recommended

Loading...
Share