परत नाही येणार दयाबेन? मालिकेच्या निर्मात्यांचा दुस-या कलाकाराचा शोध सुरु

By  
on  

सध्या मालिकाविश्वात गाजत असलेला मुद्दा म्हणजे दयाबेनची वापसी. ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील दया बेन अर्थात दिशा वाकानी मालिकेत वापसी करणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दिशा या मालिकेत कमबॅक करणार याची चर्चा महिनाभर सुरु होती. तिला विचार करण्यासाठी ३० दिवसांचा अवधीही दिला होता. पण त्यापुर्वीच दिशाच्या पात्रासाठी दुस-या कलाकाराचा शोध सुरु झाल्याने ही बाब कन्फर्म झाली आहे.

निर्माते असित मोदी यांनी दयाबेनच्या व्यक्तिरेखेसाठी शोध सुरु असल्याची बातमी स्पष्ट केली आहे. 2017 मध्ये दिशा मॅटिनर्टी लीव्हवर गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी कमबॅक करावं यासाठी प्रयत्न केले गेले. पण शोमध्ये परतण्यासाठी दिशाने मानधनात वाढ तर मागितलीच याशिवाय 11 ते 6 यावेळेत केवळ १५ दिवसच शुटिंग करणार असल्याचं कबूल केलं. पण निर्मात्यांना ही अट परवडणारी नसल्याने त्यांनी याला नकार दिला. त्यामुळे दिशा पुन्हा मालिकेत दिसण्याची शक्यता जवळपास नाहीच.

Recommended

Loading...
Share