LATEST POSTS

‘उरी’मुळे स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर लोकप्रियतेत विकी कौशल ठरला अग्रेसर !!!

विकी कौशलच्या ‘हाउज दि जोश’ ह्या डायलॉगमूळे फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही त्याच्या फॅनफॉलोविंग मध्येही वाढता जोश दिसून येतोय. 2018मध्ये संजू, मनमर्जिया आणि राजी फिल्म्सच्या यशामूळे अभिनेता विकी कौशल लोकप्रियतेच्या प्रकाशझोतात आला. पण 2019मधल्या उरी...

प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर मराठी पदार्पणासाठी सज्ज, या कॉमेडी शोमध्ये दिसणार

विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर आपल्या सगळ्यांचेच लाडके आहेत. जॉनी यांनी आपल्या अदाकारीने रसिकांना खळखळून हसण्यास भाग पाडलं आहे. जॉनी यांची हिच अदाकारी आपल्याला आता मराठीमध्येही अनुभवता येणार आहे. अभिनेता जॉनी लिव्हर मराठी शो ‘एक...

स्वप्नील जोशी झाला आम आदमी, नव्या सिनेमातील लूक केला शेअर

अभिनेता स्वप्नील जोशी वेगवेगल्या व्यक्तिरेखा साकारण्यात माहीर आहे. तो कधी mpm3 मधला रोमॅंटिक नवरा असतो तर कधी रणांगणमधील सुडाने पेटलेला नायक. हलक्या-फुलक्या भूमिकांसह सिरीअस भूमिकांमध्येही स्वप्नील भाव खाऊन जातो.https://twitter.com/taran_adarsh/status/1098083459191341056स्वप्नीलचा आणखी एक नवा लूक सोशल...

सोनी मराठीवर होणार ‘बॉईज 2’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

शालेय जीवनात दंगा-मस्ती केलेले ‘बॉईज’ कॉलेजमध्ये काय कल्ला करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ‘बॉईज २’ला प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. कलाकारांचा अभिनय, त्यांचे डायलॉग्स आणि गाण्यांमुळे‘बॉईज २’ सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोनी मराठीने आतापर्यंत अनेक मालिकांतून प्रेक्षकांची अभिरुची जाणली आहे आणि आता सुपरहिट ठरलेल्या सिनेमांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दाखवून प्रेक्षकांचा विकेंडही स्पेशल बनवत आहेत. पार्थ भालेराव, प्रतीक लाड आणिसुमंत शिंदे यांचे कॉलेज पुराण असलेल्या ‘बॉईज २’ सिनेमात आताची पिढी डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासोबत अथवा त्यांच्या अवतीभोवती जे काही घडते ती परिस्थिती मांडली आहे. जसे की इंटरनेटचा अयोग्य वापर. तसेच मुलांना न रागवतात्यांच्या कलेने त्यांना समजून सांगितले पाहिजे हा संदेश यातून देण्यात आला आहे. इरॉस इंटरनॅशनल, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अवधुत गुप्ते प्रस्तुत, लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया निर्मित ‘बॉईज २’ सिनेमाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. यंग बॉईजसह शर्वरी जमेनिस, यतिन कार्येकर, अमित्रीयन पाटील, पल्लवी पाटील, ओंकार भोजने, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांच्या देखील भूमिका यामध्ये आहेत. https://twitter.com/sonymarathitv/status/1096018882832166913 शाळेतली दंगा-मस्ती संपवून, कॉलेजमध्ये राडा सुरु करणा-या ‘बॉईज २’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहा रविवारी २४ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि संध्याकाळी ७ फक्त फक्त सोनी मराठीवर.

पाहा कॉलेजविश्वातील तरुणाईचा वेध घेणा-या ‘सेक्स,ड्रग्ज अ‍ॅण्ड थिएटर’चा टीझर

कॉलेज विश्व म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील बिनधास्त,मस्तीचे आणि बेफिकीरीचे मोरपंखी दिवस. आपलं कॉलेज, स्पर्धा, एकांकिका, प्रोफेसर, मित्र-मैत्रिणी यांच्याभोवतीच गुंफलेलं असतं. असाच एक हटके विषय घेऊन शाळा आणि फुतंरु सिनेमाफेम दिग्दर्शक सुजय डहाके प्रेक्षकांसमोर येतोय. पण ह्यावेळेस...

‘टोटल धमाल’ नंतर हा सिनेमाही होणार नाही पाकिस्तानात रिलीज, निर्मात्यांची घोषणा

पुलवामामधील लष्कराच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरोधी वातावरण आहे. प्रत्येक नागरिक आपापल्या परीने या हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. बॉलिवूड्करांनीही विविध मार्गांनी आपल्या देशभक्तीला वाव दिला आहे. अलीकडेच ‘टोटल धमाल’ सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचा सिनेमा पाकिस्तानात रिलीज...

‘छत्रपती शासन’ सिनेमातील हे गाणं तुमच्यात ‘शिवप्रेम’ पुन्हा जागवेल यात शंका नाही

प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ''छत्रपती शासन'' सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. धर्म, जाती, प्रदेशाच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना श्री छत्रपती शिवाजी...

ही अभिनेत्री आहे का अभिनयच्या आयुष्यातील ‘लेडीलव्ह’? चाहत्यांमध्ये उत्सुकता

‘अशी ही आशिकी’ या सिनेमात दिसणारी हेमल आणि अभिनय या जोडीमधील केमिस्ट्री आता ऑफ स्क्रिनवर पण दिसतेय. मराठी सिनेसृष्टीतील हे नवीन लव्ह बर्ड्स आहेत का असे बोलले जातेय. इतकेच नव्हे तर या सिनेमातील स्वयम...

पाहा शिवजयंतीनिमित्त या कलाकारांनी दिली शिवरायांना मानवंदना

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी खुप खास आहे. कारण या दिवशी महाराष्ट्राचं दैवत शिवाजीमहाराज यांची जयंती साजरी केली जाते. संपुर्ण महाराष्ट्रात हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा केला जातो. या दिवशी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही...

‘स्टेपमॉम’ करीनाने सारा अली खानला दिला डेटिंगबाबत हा सल्ला

करीनाचं आणि सैफ-अमृताच्या दोन्ही मुलांचं उत्तम जमतं. इतकंच कशालाना सारानेही तिच्यात आणि करीनाच्यात उत्तम नातं असल्याचं कबूल केलं आहे. दोघीही अनेकदा एकत्र दिसतात. इतकंच कशाला करीनाही आणि सारा एकमेकिंच्या सख्ख्या मैत्रिणी असल्यासारखं वाटतात. फॅमिली...

आला रे आला चांदणं रातीला ‘शिमगा’ आला …

होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत कोकणात शिमगा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्यासाठी सगळे गावकरी ग्रामदेवतेच्या देवळात जमतात आणि नाचत ढोलताश्यांच्या गजरात, होम करून धुमधडाक्यात शिमगा साजरा करतात . हा सण...

लग्नघरातील धमाल अनुभवायची आहे, मग पाहा ‘वेडिंगच्या शिनेमा’चा टीझर

बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी...