By  
on  

Peepingmoon 2020: यावर्षी जुन्या मालिकांवर चढला नवा साज, पहा तुमची आवडती मालिका आहे का यात

2020च्या मार्चपासून लॉकडाऊन सुरु झालं आणि सतत धावतं असलेलं जग जणू थांबलं. सतत प्रवाही असलेली मनोरंजनसृष्टीही थांबली. त्याचा परिणाम झाला प्राईमटाईमवर. मुख्य प्राईम टाईम गडबडल्यानंतर मदतीला आल्या जुन्या मालिका. या जुन्या, प्रसिद्ध मालिकांनी प्रेक्षकांचं उत्तम मनोरंजन केलं. पाहुयात या टॉप 10 मालिका कोणत्या आहेत ते......

रामायण : लॉकडाऊनमध्ये लोकप्रियतेचे नवे विक्रम करणारी मालिका म्हणजे रामायण. या मालिकेने लोकप्रियतेचे अनेक विक्रम रचले. दुरदर्शनचा टीआरपी या मालिकेने गगनाला भिडवला. मराठीमध्येही मालिका प्रसारित झाली. 

 

महाभारत : रामायणाइतकीच प्रसिद्ध मालिका म्हणजे महाभारत. जगाने गौरवलेल्या महाकाव्याचं दुरदर्शनने सगळ्यात पहिल्यांदा केलेलं प्रसारण प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान मिळवून गेलं. 

 

वहिनीसाहेब: लॉकडाऊनमध्ये जुनी लोकप्रिय मालिका ‘वहिनी साहेब’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली. घरातील सून जी आई, बहिण, मुलगी आणि विविध नात्यांमध्ये गुंतलेली असते. तिचा प्रवास, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणींवर मात करणा-या स्त्रीची कथा या मालिकेत दिसली होती. 

 

चार दिवस सासुचे: सासू आणि सुनेमध्ये कितीही मतभेद असले तरीही एक धागा मात्र दोघींना बांधणारा असतो आणि तो म्हणजे ‘कुटुंब’. सासू काय किंवा सून काय दुसऱ्या घरातून सासरी येतात आणि सासरच्याच होऊन जातात. आशालता देशमुख आणि अनुराधाचा प्रवास या महामालिकेतून पुन्हा पाहता आला. 

 

देवयानी: स्टार प्रवाहवरील काही प्रसिद्ध मालिकांपैकी एक म्हणजे, ‘देवयानी’. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. या मालिकेतील संग्राम आणि देवयानीच्या पात्राला खुप प्रेम मिळालं. राऊडी संग्राम आणि शिकलेली देवयानी यांची राग,द्वेष या मार्गावरून प्रेमाच्या वाटेवर जाणारी ही लव्हस्टोरी प्रेक्षकांना खुप आवडली.

होणार सुन मी या घरची: सहा सासूबाई आणि सुनबाईमधील गोड नात्यांची गोष्ट या मालिकेतून समोर आली. दोन्ही वेळी या मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. श्री आणि जान्हवीच्या समंजस नात्याची गोडी या लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. 

तू तिथं मी: मृणाल दुसानिक आणि चिन्मय मांडलेकर यांच्या अभिनयाने सजलेली मालिका म्हणजे तू तिथ मी. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं. लॉकडाऊनमध्येही या मालिकेने मनोरंजनाचा वसा जपला.

 

 
फुलपाखरु: मानस-वैदेही या गोड कपलची लव्हस्टोरी फुलपाखरु या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. हळवा मानस आणि लोभस वैदेही यांच्यावर प्रेक्षकांनी खुप प्रेम केलं. या मालिकेतील मानस आणि वैदेहीच्या मित्रमैत्रिणींची बाँडिंगही लोकप्रिय झाली. पुर्वीप्रमाणेच या मालिकेवर प्रेक्षकांनी खास प्रेम केलं हे वेगळं सांगायला नको. 

श्रीयुत गंगाधर टिपरे: केदार शिंदे दिग्दर्शित श्रीयुत गंगाधर टिपरे ही गाजलेली कौटुंबिक मालिका या लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली . दिलीप प्रभावळकर यांच्या अनुदिनी या कादंबरिवर आधारित या मालिकेने प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच, पण त्याचसोबत ह्यातील पात्र घराघरातलीच वाटू लागली. 

 

चिमणराव गुंड्याभाऊ: विनोदी लेखक चि.वि जोशी यांच्या 'चिमणराव व गुंड्याभाऊ' यांच्या गोष्टींवर  आधारलेली मालिका म्हणजे चिमणराव आणि गुंड्याभाऊ. मराठी प्रेक्षकांच्या आजही आठणीत असलेल्या मालिकांपैकी ही एक मालिका. चिमणराव साकारणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने ती सजली. तर  गुंड्याभाऊची भूमिका बाळ कर्वे यांनी साकारली.

Recommended

PeepingMoon Exclusive