By  
on  

PeepingMoon 2020: लॉकडाऊनमध्ये हे Furbabies बनले सेलिब्रिटींचे खरे मित्र

गेल्या मार्चपासून आपण प्रत्येकजण एका वेगळ्याच ताणातून जात आहोत. करोनाने आपल्याभोवतालचं संकट अधिकच गडद केलं असताना आपण प्रत्येकजण एका मानसिक स्थैर्याच्या शोधात होतो. अशावेळी अनेकांच्या मदतीला आले घरचे पेट्स. घरातील मुक्या जनावरांच्या निरलस प्रेमाने अनेकांचा लॉकडाऊन सुसह्य केला. मराठी सेलिब्रिटींनीही यावेळी मिळालेला वेळ त्यांच्या Furbaby सोबत घालवला. पाहा कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी....

प्रार्थना बेहरे: प्रार्थना सोशल मिडियावर तिचे पेट्स फिल्मी आणि गब्बरचे फोटो आणि व्हिडियो शेअर करत असते. या लॉकडाऊनमध्ये प्रार्थना बराच काळ फिल्मीसोबत गुजरातमध्ये होती. अनलॉकमध्ये तिने फिल्मीसोबत एकटीने मुंबई ते गुजरात प्रवासही केला. 

सई लोकूर : सईने या लॉकडाऊनमध्ये मोकासोबत बराच वेळ घालवला आहे. अगदी लग्नाच्या धामधुमीतही सईचा जीव मोकामध्ये अडकलेला दिसतो. लग्नामध्ये सईने मोकालाही गोड ड्रेस शिवला होता. 

भाग्यश्री लिमये: भाग्यश्री लिमयेचा जीव लॉकडाऊनमध्ये मांजरीच्य पिल्लांमध्ये गुंतला होता. भाग्यश्रीकडे मांजरीची तीन पिल्ले होती. या तिनही पिल्लांचे क्युट फोटो आणि व्हिडियोही अनेकदा शेअर करत असते. 

 मिताली मयेकर: मितालीच्या सोशल मिडिया अकाउंट्सवर एकीचा फोटो सारखा दिसतो ती म्हणजे तिची पेट डॉग डोरा. डोरा मितालीची लाडकी लेक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. या लॉकडाऊनमध्ये अर्थातच या दोघींनी एकमेकींसोबत बराचसा वेळ घालवला. 

पियुष रानडे : अभिनेता पियुष रानडेकडे या लॉकडाऊनमध्ये एक गोड पाहुणी आली. पियुषने या लॉकडाऊनमध्ये त्याची पेट डॉग कुल्फीला चाहत्यांच्या भेटीला आणलं. कुल्फीसोबतचे क्युट व्हिडियो पियुष नेहमी शेअर करत असतो. 

मृण्मयी देशपांडे राव: लोभस अभिनेत्री मृण्मयी देशपांडेकडे क्युट डॉग आहे. कार्बन असं या मृण्मयीच्या पेट फ्रेंडचं नाव आहे. मृण्मयी आणि कार्बन अनेकदा वॉकला जातात. मृण्मयी कार्बनचं नाव पोस्ट करताना अनेकदा प्रेमाने कार्बन मृण्मयी राव असं पोस्ट करत असते. 

मानसी नाईक: अभिनेत्री मानसी नाईकलाही मांजरींची आवड आहे. तिच्या घरी तब्बल 15 मांजरी आहेत. या मांजरींचं पालन पोषण आणि त्यांची काळजी घेण्याचं काम मानसी करते. या पंधरा मांजरींना एकत्रच जेवण दिलं जातं.

 

Recommended

PeepingMoon Exclusive