PeepingMoon 2020: या वर्षी या सेलिब्रेटींच्या जमल्या जोड्या, तुम्ही ओळखलं का यांना

By  
on  

तुमच्या आमच्या आयुष्यातील महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न. मनाजोगत्या जोडीदारासोबत आयुष्या घालवण्यासाठी साजरा केला जाणारा आनंदसोहळा म्हणजे लग्न. त्यातही आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचं लग्न असेल तर आनंद आणि उत्साह अवर्णयीय असतो. 2020 हे वर्षं करोनामुळे झाकोळलं असलं, लग्न समारंभावर अनेक बंधनं असली तरी सेलिब्रिटींनी खास अंदाजात जीवनसाथीसोबतच्या आणाभाका घेतल्या. पाहा कोणते आहेत हे सेलिब्रिटी..........

नेहा पेंडसे-बयास : मराठी सिनेमातील स्टायलिश अभिनेत्री नेहा पेंडसे शार्दुल सिंग बयाससोबत लग्नबंधनात अडकली. एका खासगी सोहळ्यात नेहा तिच्या ड्रीम बॉयसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. महाराष्ट्रीयन पद्धतीची गुलाबी साडी नेसलेल्या नेहाने त्याला साजेसा चोकर आणि 3 लेयर नेकपीस घातला आहे. याशिवाय चंद्रकोर आणि नथने फॅन्सचं लक्ष वेधून घेतलं. 

शर्मिष्ठा राऊत-देसाई: अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तेजस देसाईसोबत लग्नाच्या बेडीत अडकली. हळदी, मेहंदी, चुडा या रितसर विधीनंतर तिच्या लग्नाचे विधी पार पडले. तेजस एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो. लग्न विधींसाठी दोघांनी पेशवाई थीम केली होती. यामध्ये तिने गर्द हिरव्या रंगानी नऊवारी नेसली होती. तर तेजसने पगडी कुर्ता आणि धोती असा पेहराव केला होता. 

सई लोकुर-रॉय: बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर यावर्षी लग्नबंधनात अडकली आहे. बंगाली तिर्थदीप रॉयसोबत सईने लगीनगाठ बांधली. बेळगावात सईच्या या लग्नसोहळ्याचे विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी दोघांचा पेशवाई थाट असलेला पेहराव पाहायला मिळाला. यावेळी सई बंगाली आणि मराठी अशा दोन्ही लूकमध्ये दिसली. 

कार्तिकी गायकवाड-पिसे: ‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड अलीकडेच लग्नबंधनात अडकली. पुणेस्थित व्यावसायिक रोनित पिसेशी कार्तिकीचा विवाह संपन्न झाला. कार्तिकिचा पती रोनित पिसे हा पुण्याचा राहणारा असून इंजिनीअर आहे. विशेष म्हणजे रोनितलाही संगीताची आवड आहे. तो उत्तम तबलावादक आहे. 

अर्चना निपाणकर- रामनाथपुर: 'का रे दुरावा' या मालिकेतील जुईच्या व्यक्तिरेखेत दिसलेली अर्चना निपाणकर या वर्षीदाक्षिणात्य पध्दतीने लग्नाच्या बेडीत अडकली.  अर्चना निपाणकरने पार्थ रामनाथपुर याच्यासोबत विवाह केला.

Recommended

Loading...
Share