By  
on  

Holi Celebration 2021: या सेलिब्रिटींसाठी यंदाची होळी असणार आहे खुपच खास

सध्या सगळीकडे रंगीबेरंगी वातावरण आहे. होळीच्या रंगांचा उत्साह प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागला आहे. करोनामुळे या उत्सवावर काहीसं सावट आहे. पण असं तरी वर्षातून एकदा येणा-या या सणाचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. काही सेलिब्रेटींसाठी मात्र यंदाची होळी खुपच खास आहे.  यावर्षाच्या सुरुवातीलाच काही मराठी सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकले. आपल्या पार्टनरसोबत यावर्षी पहिल्यांदाच ते होळीचा सण साजरा करणार आहेत. पाहुयात कोण कोण आहेत हे सेलिब्रिटी.

स्वप्नाली- आस्ताद काळे: नुकतंच अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी लगीनगाठ बांधली. 14 फेब्रुवारी म्हणजे डे च्या दिवशी दोघं विवाहबंधनात अडकले. छोटेखानी सोहळा करून या दोघांनी लगीनगाठ बांधली. ही होळी या दोघांचीही पती-पत्नी म्हणून पहिलीच होळी आहे. 

 

मिताली- सिद्धार्थ चांदेकर: क्युट कपल मिताली सिद्धार्थ नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले. चाहते खुप दिवसांपासून या जोडीच्या लग्नाची वाट पाहात होते. या लग्नसोहळ्याची मिताली-सिद्धार्थच्या लूकची बरीच चर्चाही रंगली. ही जोडी लग्नापुर्वी दोन वर्षं रिलेशनशीपमध्ये असली तरी लग्नानंतरही जोडी पहिल्यांदाच एकत्र होळी साजरी करणार आहे. 

 

मानसी- प्रदीप खरेरा : या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. यात अभिनेत्री मानसी नाईकही आहे. मागील वर्षी मानसी आणि प्रियकर प्रदीपने साखरपुडा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीलाच ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली. मानसीच्या यंदाच्या होळीला पती प्रदीपमुळे हरियाणवी टचही मिळणार आहे. 

अभिज्ञा – मेहुल पै: प्रसिध्द अभिनेत्री अभिज्ञा भावेने ६ जानेवारी रोजी प्रियकर मेहूल पैसोबत लग्नगाठ बांधली. अभिज्ञाचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पती मेहुलसोबत अभिज्ञाची ही पहिलीच होळी असणार आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive