महाराष्ट दिन: मराठी संस्कृतीचा खजिना उलगडणारी ही गाणी जरुर ऐका

By  
on  

105 व्यक्तींच्या त्यागाने, बलिदानाने महाराष्ट्राची भूमी पुनीत झाली आहे. या बलिनाचा त्यागाचा दिवस म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रतिभाही बहुआयामी आणि बहुमुखी आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीला लोकसंगीताने, लोकगीतांनी अनोखा साज चढवला आहे. अशीच काही संस्कृतीचं दर्शन घडवणा-या गीतांनी तुमचा महाराष्ट्र दिन सुरेल बनवा.

 

लावणी :

महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका कलाप्रकार म्हणजे लावणी लावणी हा कलाप्रकार शृंगार व भक्ती या रसांचा परिपोष करण्यासाठीहचं माध्यम समजलं जातं. लावणीने मराठी मनांचं कलाविश्व व्यापलं आहे. लावणी आवडत नाही असा मराठी माणूस शोधून सापडणार नाही. सांगते ऐका सिनेमातील ही लावणी अख्ख्या महाराष्ट्राला झुलायला लावणारी आहे. 

 

 

 

 

पोवाडा:

वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र पोवाड्यात गायलं जातं. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर अनेक पोवाडे रचले आहे. त्यापैकीच एक आहे अफजल खान वधाचा पोवाडा. हा पोवाडा ऐकून तुमच्यात वीरश्री संचारेल हे नक्की.

 

 

जागरण गोंधळ:

महाराष्ट्रातील प्रत्येक शुभकार्याला देवांना आमंत्रण देऊन कार्य निर्विघ्न पार पाडण्याची विनंती केली जाते. वाघ्या मुरळी किंवा मुरळी या नृत्यामधून देवाची स्तुती केली जाते. 
 

 

ठाकर गीत:

ठाकर किंवा इतर आदिवासी समाजाचं जनजीवन जैत रे जैत या सिनेमातून पाहता आलं. तर या समाजाच्या लोकसंगीताची जादू या गाण्यांमधून अनुभवता आली. 
 

Recommended

Loading...
Share