By  
on  

महाराष्ट्र दिन विशेष : हे मराठी सिनेमे पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल

बहु असोत सुंदर संपन्‍न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार उडवला असून राज्यात लागू निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा महाराष्ट्र दिनही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तुम्ही निराश होऊ नका, महाराष्ट्र दिनानिमित्ताने महाराष्ट्राबद्दल जाणून अभिमान वाटेल  असे मराठी सिनेमे पाहा व या करोना संकटाशी लढण्याचं बळ घ्या. 

 

मी शिवाजीराजे भोसले बोलतोय

 

प्रत्येक मराठी माणसाला त्याचा अभिमान वाटायला लावणारा आणि आपली ताकद दाखवून द्यायला लावणारा हा सुपरहीट मराठ सिनेमा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. महेश मांजरेकर दिग्दर्शित या सिनेमात अभिनेते सचिन खेडेकर यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली. प्रत्येक मराठी माणसाचा ऊर हा मराठी सिनेमा पाहून अभिमानाने फुलतो. 

या सिनेमातील झटकून टाक ती आग मराठी आता.. राजे...हे गाणं ऐकताच क्षणी आपसूकच अंगावर शहारे येतात.

 

 

 

ठाकरे 

महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना भगवं स्वप्न दाखवणारे 'हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे' यांच्या शोर्याची गाथा या सिनेमात अनुभवता येते. मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी बाळासाहेब ठाकरे नेहमीच ढाल बनून उभे राहिले. त्यांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसांना त्यांच्या हक्कांसाठी लढायला शिकवलं. हा महाराष्ट्र बाळासाहेबांचा सदैव ऋणी राहील. अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीने ठाकरे या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारत रसिकांना आश्चर्याचा धक्का दिला.

 

 

 

 

बघतोस काय मुजरा कर 

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं  शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करण्यासाठी अनेक गड किल्ले बांधले, अनेक गड-किल्ले जिंकले. महाराष्ट्राला महाराजांनी गड-किल्ल्यांच्या माध्यमातून समृध्द केलं. एक ओळख दिली. महाराजांच्या या सगळ्या गड किल्ल्यांचे महत्त्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी बघतोस काय मुजरा कर या सिनेमातनं केला. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही बाजू हेमंत ढोमे सांभाळल्या.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive