Mothers day special: अभिनयक्षेत्रात चमकत आहेत माय-लेकरांच्या या जोड्या, पाहा फोटो

By  
on  

आपल्या प्रत्येकाचं विश्व एका शब्दाभोवती गुंफलेलं असतं ते म्हणजे आई. आईचा प्रेमळ सहवास, शिकवण सगळ्यांनाच एकप्रकारे श्रीमंत माणूस बनवत असते. आई इतकं निरपेक्ष प्रेम कुणाचं नाही. आजचा दिवस मदर्स डे म्हणून झोकात साजरा केला जातो आहे. मराठी सिनेसृष्टीतही माय- लेकरांच्या जोड्या आहेत ज्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहेत. पाहुयात कोण कोण आहेत या....

मृणाल- विराजस : माय लेकरांची ही सुपरहिट जोडी अभिनय क्षेत्रात एकत्र आहेच. पण पडद्यामागेही या जोडीने एकत्र काम केलं आहे. मृणाल यांनी ‘ती & ती’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. तर विराजसने या सिनेमाची पटकथा लिहिली होती. विराजस सध्या ‘माझा होशील ना’ मध्ये दिसत असला तरी प्रेक्षक यांना एकत्र स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक असतील यात शंका नाही. 

प्रिया- अभिनय बेर्डे: सगळ्यांच्या लाडक्या लक्ष्यामामाचा वारसा पुढे नेण्यासाठी अभिनय सज्ज झाला आहे. अर्थात आई प्रिया बेर्डेची त्याला सक्षम साथ मिळाली आहे. माय- लेकराची ही जोडी रंपाट या सिनेमात दिसली होती. 

 

शुभांगी- सखी गोखले: ज्येष्ठ अभिनेते मोहन आणि अभिनेत्री शुभांगी गोखले यांची सखी ही मुलगी. तिच्या लहानपणापासूनच घरात सिनेमा, नाटक याविषयीचे वातावरण होते. त्यामुळे सखी या क्षेत्रात आली नसली तर नवलच. सखी-शुभांगीची जोडी पडद्यावरही तितकीच कूल दिसेल यात शंका नाही. 

सुचित्रा- सोहम बांदेकर: आई-वडिलांप्रमाणेच सोहमनेही अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा केला आहे. सोहमने यापूर्वी 'ललित २०५' या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पडली होती. पण आता तो नवे लक्ष्य या मालिकेत पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसतो आहे. सुचित्रा आणि सोहम आता एकत्र पडद्यावर लवकरच दिसोत अशी आशा चाहते करत असतील. 

 

सुप्रिया- श्रीया पिळगावकर: सचिन आणि सुप्रिया अशी मराठी सिनेमातील दिग्गज नावांमध्ये श्रीयानेही स्वत:ची खास ओळख बनवली आहे. विशेष म्हणजे श्रेयाचा डेब्यु मराठी सिनेमा एकुलती एकमध्ये श्रीयासोबत सचिन आणि सुप्रिया देखील दिसले होते. मायलेकींची ही जोडी अ‍ॅडमध्येही दिसते आणि प्रेक्षकांना खुप भावते देखील.

 

Recommended

Loading...
Share