Mother’s day special: या ‘Superfit moms’ अभिनयातही आहेत तरबेज, पाहा फोटो

By  
on  

आजकालच्या युगात फिटनेस ही गरज बनली आहे. आपण फिट असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या स्त्रियांना कामाच्या स्वरुपामुळे अनेकदा फिट रहावं लागतं. सिनेसृष्टीत काही अभिनेत्री आहेत ज्या सुपर फिट मॉम असल्याचं किताब अभिमानाने मिरवतात. या अभिनेत्री चाहत्यांना जबरदस्त फिटनेस गोल्स देतात हे नक्की. पाहुयात कोण कोण आहेत या अभिनेत्री 

माधवी निमकर: अभिनेत्री माधवी निमकर फिटनेस फ्रिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण या लॉकडाऊनमध्ये माधवी अनेक अवघड आसनं करून फॅन्सनाही चकित करत आहे. अनेक वर्षांपासून माधवी नियमितपणे योगाची प्रॅक्टीस करत आहे. अगदी कठीण आसनंही ती लीलया करू शकते. अनेकदा ती वर्कआऊट व्हिडियोही शेअर करताना दिसते. माधवी रुबीन नावाच्या गोड मुलाची आई आहे. 

 

स्नेहलता वसईकर: पुण्यश्लोक अहिल्याबाई या ऐतिहासिक हिंदी मालिकेत अभिनेत्री स्नेहलता वसईकर गौतमीबाई अर्थात मल्हार राव होळकर यांच्या पत्नी व अहिल्याबाईंच्या सासूबाईच्या भूमिकेत दिसत आहे. स्नेहलताने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. शौर्या या गोड मुलीची आई असलेली स्नेहलता फिटनेसबाबत खुप काटेकोर असते. 

 

सोनाली खरे: अभिनेत्री सोनाली खरे फिटनेसच्या बाबतीत फार जागरुक आहे. अनेकदा ती तिचे व्हिडियोज सोशल मिडियावरही शेअर करत असते. सोनालीने फिटनेस आणि लाईफस्टाईल संदर्भात एक युट्युब चॅनेलही सुरु केलं आहे. लॉकडाऊनमुळे सोनाली घरी असली तरी फिटनेसबाबत मात्र ती जागरुक आहे. या व्हिडियोजमध्ये सोनालीची पार्टनर असते लेक सनाया. सोनाली आणि सनाया अनेकदा वर्कआऊटचे व्हिडियो शेअर करत असतात. 

 

श्वेता शिंदे: निर्माती आणि अभिनेत्री असलेली श्वेता शिंदे सुपरफिट अभिनेत्री आहे. याशिवाय वामिका नावाच्या गोड मुलीची आई देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर श्वेताने केलेलं कमबॅक तिच्या फॅन्ससाठी आनंदाची बाब आहे. फिटनेसमुळेच शॉर्ट ड्रेस असो किंवा साडी श्वेता खास दिसते. 

 

रेशम टिपणीस: दोन टीनएज मुलांची आई न वाटता मैत्रिण दिसण्याचं सगळं श्रेय रेशमच्या फिटनेसप्रेमाला जातं. वयाच्या 44 वर्षी सुपरफिट आणि सुपर कूल दिसणारी रेशम सोशल मिडियावर सक्रिय आहे. रेशम सध्या छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते.

 

 

Recommended

Loading...
Share