सौभाग्यकांक्षिणी ते वधू, पाहा सोनाली कुलकर्णीचा हा मनमोहक अंदाज

By  
on  

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी लग्नाच्या बेडीत अडकली आहे. फियॉन्से कुणाल बेनोडेकरसोबत सोनालीने लग्नगाठ बांधली अत्यंत साध्या सोहळ्यात सोनली आणि कुणालने आयुष्यभराची सोबत करण्याचं वचन दिलं. करोनाची वाढती परिस्थिती, वाढत जाणारे प्रतिबंध यामुळे सोनाली आणि कुणालने अत्यंत साधेपणाने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 

2020 मध्ये 2 फेब्रुवारीला सोनालीने कुणालसोबत साखरपुडा केला होता. यावेळी तिचा लूक चाहत्यांना आवडला होता. सोनेरी-पिवळ्या रंगाची साडी, साजेसे दागिने, गजरा, नथ या लूकमध्ये सोनालीचा साजिरा अंदाज खुलून आला. सोनालीचा लग्नाचा लूक साखरपुड्याच्या लूकपेक्षा सिंपल असला तरी वधू असण्याचा ग्लो तिचा लूक खुलवत होता.

 

निळीशार साडी, मंगळसुत्र, सिंदूर, नथ, गजरा यामध्ये नववधू सोनाली खुलून दिसत होती. साधेपणाने लग्न करण्याच्या संकल्पनेसोबतच चाहत्यांना तिचे सिंपल लूकही तितकेच आवडले आहेत.

Recommended

Loading...
Share