By  
on  

आम्ही दोघी ! या आहेत मराठी कलाविश्वातील बहिणींच्या प्रसिध्द जोड्या

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपलं स्थान निर्माण करतायत. आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून  रसिक प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवतायत, पण कदाचित रसिकांनाच त्या बहिणी असतील हे ठाऊक नसेल. म्हणून या सेलि्ब्रिटी बहिणींविषयी जाणून घेऊयात. 

 

 

वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर 

 

वंदना गुप्ते आणि भारती आचरेकर या दोघींही सख्या बहिण. मराठी सिनेविश्वातल्या दिग्गज अभिनेत्री म्हणून दोघींनीही नाव कमावलं आहे. अनेक मालिका, सिनेमे आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडलीय. इतकंच नव्हे तर उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच त्या एक उत्तम गायिकासुध्दा आहेत. त्यांच्या आई माणिक वर्मा या भारतीय संगीत क्षेत्रातल्या खुप मोठ्या शास्त्रीय गायिका होत्या. मराठीच नाही तर हिंदी कलाविश्वातसुध्दा या दोघी बहिणी आपल्या अभिनयासाठी प्रसिध्द आहेत. 

 

 

पूर्णिमा तळवलकर आणि पल्लवी वैद्य 

छोट्या पडद्यावरची पूर्णिमा आणि पल्लवी ही सख्या बहिणींची जोडी.  या दोघी बहिणी आहेत हे अनेकांना ठाऊकच नसेल. या दोघींचं माहेरचं आडनाव भावे आहे. अनेक लोकप्रिय मालिकांमदून या दोघी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतात. पूर्णिमाने दिवंगत प्रसिध्द दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांच्या पुतण्याशी लग्न केलं आहे. तर पल्लवीचे पती केदार वैद्य हे दिग्दर्शक आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पल्लवीने साकारलेली पुतळा राणीसाहेबांची भूमिका लक्षवेधी ठरली. तर पूर्णिमाने अनेक मराठी मालिका गाजवल्या आहेत. सध्या रंग माझा वेगळामधील राधा आई म्हणून ती प्रेक्षकांसमोर येते. 

 

 

भार्गवी चिरमुले आणि चैत्राली गुप्ते 

 

भार्गवी आणि चैत्राली या सिनेविश्वातल्या सक्या बहिणींची जोडी. भार्गवीने मोलकरीणबाई, वहिनीसाहेब अशा मालिकांमधून तर संदूक, वन रुम किचन अशा सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. भार्गवी एक कुशल नृत्यांगनासुध्दा आहे. तिने सेलिब्रिटी नृत्याच्या रिएलिटी शोचं विजेतेपदही पटकावलंय. तर तिची बहिण चैत्रालीसुध्दा उत्तम अभिनेत्री आहे. 

 

मृण्मयी आणि गौतमी देशपांडे

 

मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमीनेसुध्दा मालिका विश्वात आापलं स्थान निर्माण केलं आहे. मृण्मयीने अग्निहोत्र या मालिकेतून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक मालिका आणि सिनेमे गाजविल्यानंतर मृण्मयी एक यशस्वी दिग्दर्शिकासुध्दा बनलीय. तर गौतमी साकारत असलेली माझा होशील ना या मालिकेतील सई नायिकासुध्दा प्रचंड गाजतेय. गौतमी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिकासुध्दा आहे. 

 

तितिक्षा आणि खुशबू तावडे 

 

छोट्या पडद्यावरच्या या तावडे भगिनी सोशल मिडीयावरसुध्दा नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करताना पाहायला मिळतात. तितिक्षाने सरस्वती, तू अशी जवळी रहा या मालिकांमधून नायिका साकारलीय. तर खुशबूची आम्ही दोघी मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली.  या दोघींनीही हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे. मागच्यावर्षीच त्यांनी मुंबईत मालाड येथे साईड वॉल्क कॅफे नावाचा कॅफे सुरु केला आहे.  

 

 

 

 

समिधा गुरु आणि मृणाल देशपांडे 
 

अभिनेत्री समिधा गुरु आणि मृणाल देशपांडे या दोघी सख्या बहिणी आहेत. अनेक मालिका, नाटक व सिनेमांमधून या बहिणी आपल्या अभिनय कौशल्याची चुणूक दाखवतात. समिधा गुरु सध्या ऑनलाईन शुभमंगल मालिकेत ऐश्वर्या ही नकारात्मक भूमिका साकातेय. तिची ही भूमिका प्रचंड गाजतेय. तर अभिनेत्री मृणाल देशपांडे यांची पुढचं पाऊल मालिकेतील भूमिका चांगलीच चर्चेत होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive