By  
on  

दादा कोंडके यांनीच दिलं होतं या संगीतकार जोडीला राम-लक्ष्मण हे नाव

मराठी व हिंदी सिनेविश्वातील प्रसिध्द संगीतकार जोडी राम लक्ष्मण यातील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नागपूर येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीतक्षेत्रात या जोडगोळीने भरीव योगदान दिलं. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या नावाने दिल्या  जाणा-या लता मंगेशकर पुरस्काराचाही यात समावेश आहे.तसंच मैने प्यार किया या राजश्री प्रोडक्शनच्या सुपरहिट सिनेमासाटी या जोडीला फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

महत्त्वाचं म्हणजे दादा कोंडके यांच्या पांडू हवालदारपासून ते जवळपास त्यांच्या सर्वच सिनेमांना राम-लक्ष्ण या संगीतकार जोडगोळीने संगीत दिलं होतं. राम लक्ष्मण यांच्या जोडीने पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील अफाट गाणी सिनेसृष्टीला दिली. यातील सर्वच गाणी आजही प्रेक्षक  उचलून धरतात. 

विजय पाटील हे संगीत क्षेत्रात नाव आजमावण्यासा"r नागपूरहून मुंबईला आले होते. त्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. एका कार्यक्रमात या दोघांची गाणी पाहून दादा कोंडकेंनी त्यांना आपल्या पुढच्या सिनेमात ऑफर दिली आणि त्यानंतर या जोडगोळीने दादांच्या अनेक सिनेमांची गाणी सुपरहिट केली. दादांना विजय पाटील यांना घरी लखन म्हणून संबोधतात हे माहित होतं आणि हेच हेरुन त्यांनी या जोडीला स्वत:च राम-लक्ष्मण हे नाव दिलं. 

Recommended

PeepingMoon Exclusive