Brothers Day: या गायक भावंडांच्या जोड्या करत आहेत चाहत्यांच्या मनावर राज्य

By  
on  

आज Brothers day आहे. मराठी संगीत क्षेत्राला मोठी परंपरा आहे. ही वैभवशाली परंपरा पुढे नेण्याचं काम मराठमोळी गायक भावंडं करत आहेत. Brothers day पाहुयात कोण कोण आहेत ती भावंडं.

अजय- अतुल: अजय आणि अतुल या जोडीनी फक्त मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीलाही आपल्या गाण्यांवर थिरकायला लावलं आहे. या अफलातून जोडीची सर्वच गाणी सुपर हीट आहेत. मराठी संगीतामध्ये गाण्यांचं नवं युग सुरु करणारे गायक-संगीतकार म्हणजे अजय अतुल. या जोडीने केवळ मराठीमध्येच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. 

आदर्श- उत्कर्ष : आदर्श आणि उत्कर्ष या भावंडांना घरातूनच गाण्याचा वारसा मिळाला आहे. वडील आनंद शिंदे यांच्याकडून या दोघांनीही गाण्याचा वारसा घेतला आहे. ही जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून एकत्र दिसते. उत्कर्ष डॉक्टर आहेच. पण वारसाहक्काने मिळालेल्या संगीत कलेकडे त्याने अजिबात दुर्लक्ष केलं नाही. 'फुंकर' या मराठी सिनेमालासुद्धा उत्कर्षने संगीत दिले आहे.

प्रसेनजित आणि अभिजीत : इंडियन आयडॉल, सा रे गा मा पा या स्पर्धांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली कोल्हापूरच्या रांगड्या मातीतून आलेली गायक भावंडांची जोडी म्हणजे प्रसेनजित आणि अभिजीत कोसंबी. कोल्हापुरात रजनी करकरे यांच्याकडून या दोघांनीही संगीताचे शिक्षण घेतलं आहे.

Recommended

Loading...
Share