By  
on  

Diwali 2021: चिमुकल्यांमुळे यंदाची दिवाळी या सेलिब्रिटींसाठी आहे खास

दिवाळी म्हणजे सणांचा राजा. सर्वत्र दिव्यांची झगमगती रोषणाई, मिठाई, फराळाची रेलचेल आणि आप्तेष्टांच्या गाठी-भेठी.   दिवाळी या सणासाठी लहान-मोठे सगळेच खूप उत्सुक  असतात. हेच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या कलाकारांच्या घरी मात्र यंदा द्विगुणित होणार आहे. कारणही तसंच हे, त्यांच्या घरी आलेल्या गोड चिमुकल्यांसोबत त्यांची यंदाची दिवाळी खास असणार आहे. 

शशांक केतकर 

मराठी मालिकाविश्वातला लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर आणि त्याची पत्नी प्रियांका केतकर यांनी काही महिन्यांपूर्वीच आपण आई-बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली होती. हे दोघंही एका गोंडस मुलाचे आई-बाबा झाले आहेत. ऋग्वेद असं त्याचं नाव आहे. त्यामुळे ऋग्वेदसोबतची ही त्यांची पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे घरात आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असणार यात शंका नाही. 

 

स्मिता तांबे 

जोगवा, ७२ माईल्स, देऊळ यांसारख्या मराठी सिनेमातून आपल्या सशक्त अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता तांबे . स्मिता तांबेचं डोहाळेजेवण तिच्या मैत्रीणींनी उत्साहात साजरं केलं होतं. तो व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. काही महिन्यांपूर्वीच स्मिताच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. स्मिता आणि विरेंद्र द्विदेवी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे.  कन्यारत्नाचा लाभ झाल्याने यंदा लेकीसोबतची त्यांची ही पहिलीच दिवाळी खुप खास असणार आहे. 

 

आरोह वेलणकर 


मराठी सिनेमे आणि मालिकांमधून प्रेक्षकांचा लाडका ठरलेला अभिनेता आरोह वेलणकर काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. आरोहची पत्नी अंकिताने गोंडस मुलाला जन्म दिला. अर्जून वेलणकर असं त्याच्या मुलाचं नाव आहे.सोशल मिडीयावर आरोहने अर्जूनसोबतचा गोड फोटो शेअर केला आहे. अर्जुनसोबतची आरोहची ही पहिलीच दिवाळी असल्याने वेलणकर कुटुंबियांच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 

 

सावनी रविंद्र 

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका 'सावनी रविंद्र' हिला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात बार्डो या मराठी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून नुकतंच सन्मानित करण्यात आलं. गायिका सावनी रविंद्र आणि तिचे पती डॉ. आशिष धांडे यांना ऑगस्ट महिन्यात कन्यारत्नाचा लाभ झाला. त्यांनी गोंडस लेकीचं नाव शार्वी असं ठेवलंय. राष्ट्रीय पुरस्काराचा आनंद आणि लेकीची पहिली दिवाळी असा यंदा दबल धमाका दिवाळीत सावनीच्या घरी असणार यात शंका नाही.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive