By  
on  

Diwali 2021 : या अभिनेत्रींच्या स्टायलिंग टिप्सने दिवाळीला दिसा सुपर स्टायलिश

आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस सगळीकडे उत्सवी वातावरण असतं. सध्या दिवाळी साजरी करण्याचा संदर्भ सगळीकडे बदलताना दिसत आहे. पण दिवाळीच्या काही प्रथा आजही अगदी नित्यनेमाने पाळल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे नवीन कपड्यांची. दिवाळीच्या वेळी पारंपरिक पण  स्टायलिश लूकमध्ये नटायला प्रत्येकालाच आवडतं.

तुमच्या लाडक्या अभिनेत्रींची ही स्टाईल तुम्हाला नक्कीच ट्राय करायला आवडेल. दिवाळी आणि साडी हे कॉम्बिनेशन परफेक्ट असलं तर लेहंगा कधीही आऊटडेटेड होत नाही. गोल्ड्न किंवा कोणत्याही ब्राईट कलरचा लेहंगा तुमचा लूक खुलवू शकतो. यावर अ‍ॅक्सेसिरीज तुमचा लूक आणखी खुलवू शकतो. 

या दिवाळीला साडीचा लूक करणार असाल तर ब्लाऊजमध्ये अनेक व्हरायटी ट्राय करता येतील. हॉल्टर नेक आणि बॅक स्ट्रॅपचं ब्लाऊज तुम्हाला बोल्ड पण क्लासी लूक देईल. 

 

 

या दिवाळीला जरीचे वनपीस ट्रेंडमध्ये आहेत. पैठणीचा वनपीस किंवा अंगरखा कुर्ता तुम्हाला खास लूक देईल. 

साडी तर दिवाळीसाठी एव्हरग्रीन फॅशन आहे. यासोबतच तुम्ही स्टेटमेंट पीस किंवा हेवी कुंदन ज्वेलरी कॅरी करु शकता.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive