Diwali 2021 : दिवाळी पाडव्याला या सेलिब्रिटी जोड्यांचा दिसला खास अंदाज 

By  
on  

लक्ष्मीपुजनानंतर दिवाळीचा महत्त्वाचा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. साडेतील मुहुर्तंपैकी एक असलेल्या या दिवसाचं महत्त्व खास आहे. आजच्या दिवशी पत्नी आपल्या पतींना ओवाळतात. त्यांच्याकडून घसघशीत ओवाळणीही घेतात. मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी कपलही पाडव्याचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. तुमची लाडकी जोडी कोणती आहे. 

प्रिया-शंतनू मोघे: 
अनेक मालिकांमधून एकत्र दिसलेली ही जोडी पाडव्या दिवशी खास अंदाजात दिसली. 

 

 

आयुषी- सुयश टिळक: 
अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेली ही जोडी चाहत्यांचं लक्ष वेधून घेते आहे. 

 

मिताली- सिद्धार्थ चांदेकर : 
यावर्षीच लग्नाच्या बेडीत अडकलेली ही गोड जोडी यंदा पहिली दिवाळी साजरी करते आहे. 

 

अ‍मृता – हिमांशू मल्होत्रा : 
पती हिमांशूसोबत दिवाळीसाठी अमृताचा खास अंदाज दिसून आला. 

 

सुखदा- अभिजीत खांडकेकर :  
मालिकांतून भेटीला येणा-या या गोड जोडीच्या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Recommended

Loading...
Share