By  
on  

PeepingMoon year ender 2021: मराठी सिनेविश्वातील या कलाकारांनी घेतला जगाचा निरोप

एखाद्या कलाकाराचं निधन झाल्यानंतर ती फक्त त्याच्या कुटुंबाचीच हानी नाही तर कलाविश्वाचीसुध्दा मोठी हानी होते. त्या कलाकाराच्या निधनाने कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण होते. यंदासुध्दा अनेक कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. कोणी संपूर्ण जगावर ओढवलेल्या करोना संकटामुळे, तर  कोणी आजाराने तर कोणी वृध्दापकाळाने. पुढील कलाकारांनी 2021 मध्ये ह्या जगाचा निरोप घेतला. 

 

 

 सुमित्रा भावे 

ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी यंदा एप्रिल 2021 मध्ये अखेरचा श्वास घेतला. चाकोरीबाहेरील सिनेमांसाठी त्या ओळखल्या जात. सिनेविश्वात आपल्या अप्रतिम कलाकृतींसाठी सुमित्राताई प्रसिध्द होत्या. त्या 78 वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या ‘कासव’ या चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

 

वीरा साथीदार 

2017 सालातील ‘कोर्ट’ हा सिनेमा चांगलाच गाजला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या या सिनेमातील वीरा साथीदार यांचं करोनाने निधन झालं आहे. ‘कोर्ट’ या सिनेमात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नागपुरातील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. 
या सिनेमाने अनेक पुरस्कार पटकावत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरलं. एवढचं नाही तर सिनेमाने ऑस्करपर्यंत मजल मारली. ‘बेस्ट फॉरेन फिल्म’ या श्रेणीत ‘कोर्ट’ सिनेमाची निवड झाली होती.शिवाय सिनेमातील वीरा साथीदार यांच्या अभिनयाच भरपूर कौतुक झालं. या सिनेमात नारायण कांबळे ही मुख्य भूमिका त्यांनी साकारली होती.

 

किशोर नांदलस्कर 

 ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. ठाणे येथील रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. . नांदलस्कर यांनी सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले आहे. व्यावसायिक रंगभूमीवर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून प्रेक्षकांना पोट धरून हसवलं.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘

 

 

श्रीकांत मोघे

मराठी ज्येष्ठ नाट्य आणि सिनेअभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा असो की पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी रसिकांना मनमुराद आनंद देणारे कलाकार अशी नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे यांची ओळख आहे.त्यांना महाराष्ट्र शासनाच्या अनेक नामवंत पुरस्करांनी गौरविण्यात आलं होतं. 

 

 

माधवी गोगटे 

मराठी हिंदी मालिका तसेच मराठी व हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणा-या प्रसिध्द ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचं निधन झालं. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'भ्रमाचा भोपळा’ आणि ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची मराठी नाटकं तुफान गाजली. तसेच .‘घनचक्कर’ या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर प्रमुख भूमिका साकारली होती. या मराठी चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. मृत्यूपूर्वी त्यांची सुरु असलेल्या अनुपमा या लोकप्रिय मालिकेतील आईची भूमिका लक्षवेधी ठरली. 
 

 

नवनाथ गायकवाड 

‘फत्तेशिकस्त’ आणि ‘फर्जंद’ सारख्या चित्रपटांत झळकलेले अभिनेते नवनाथ गायकवाड यांचं करोनामुळे निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार घेतानाच त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या निधनाने एका गुणी कलाकाराला सिनेसृष्टी मुकली. 

 

हेमंत जोशी 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘जीव झाला येडापिसा’मध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे निधन झाले .करोनामुळे त्यांचे निधन झाले.  १९ मे रोजी हेमंत यांनी अखेरचा श्वास घेतला. हेमंत यांनी आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत ते भावे ही भूमिका साकारत होते. ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘तेंडल्या’, ‘लायब्ररी’, ‘बालगंधर्व’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या होत्या. रात्रीस खेळ चाले मालिकेतही ते झळकले होते.

 

अभिलाषा पाटील 

त मराठमोळी अभिनेत्री अभिलाषा पाटीलचं देखील करोनामुळे निधन झालंय. अभिलाषाच्या निधनाच्या बातमीने कलाक्षेत्रात मोठा धक्का बसलाय. बनारसमध्ये अभिलाषा एका हिंदी वेब सीरिजचं शूटिंग करत होती. याच वेळी अचानक तिची तब्येत बिघडली. त्यानंतर ती मुंबईत परतली. मुंबईत परतल्यावर करोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती अधिक खालावल्याने अभिलाषाला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र करोनाशी तिची झुंज अपयशी ठरली.
अभिलाषाने ‘प्रवास’, ‘तुझं माझं अरेंज मॅरेज’, ‘पिप्सी’ अशा मराठी सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्याचसोबत तिने बापमाणूस या मालिकेतही महत्वाची भूमिका साकारली होती. याच सोबत ती ‘छिछोरे’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ अशा हिंदी सिनेमांसोबत काही हिंदी वेब सीरिजमध्ये झळकली होती

 

ईश्वरी देशपांडे

ईश्वरी देशपांडे या मराठी अभिनेत्रीचा मृत्यू संपूर्ण कलाविश्वाला चटका लावून गेला. २० सप्टेंबर रोजी गोव्यातील बागा-कलंगुट येथे गाडी खाडीत कोसळून ईश्वरी व तिचा मित्र शुभम देगडेचा मृत्यू झाला.अरुंद रस्त्यावरुन जात असताना शुभमचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी खाडीत जाऊन कोसळली. दरम्यान गाडी लॉक झाल्यामुळे दोघेही गाडीत अडकले. नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ईश्वरीने आजवर काही मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ती हिंदी मालिकांमध्येही झळकली होती. काही दिवसांपूर्वी तिने मालिकांचे चित्रीकरण पूर्ण केले होते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive