By  
on  

जेव्हा लता मंगेशकर यांनी सीआयडी फेम एसीपी प्रध्युम्न यांच्यावर रोखली होती बंदूक

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एका तपाचा अंत झाला. त्यांनी आपल्या सुरेल स्वरांनी भारतीय श्रोत्यांवर मोहिनी घातली. लतादीदी या सोशल मिडीयावर नेहमीच एक्टिव्ह असायच्या, एकदा त्यांनी सीयाडी या तुफान लोकप्रिय मालिकेचे एसीपी प्रध्युम्न फेम प्रसिध्द मराठी अभिनेते शिवाजी साटम यांच्यासोबतचा फोटो शेयर केला होता. 

 

हा साधासुधा  फोटो नव्हता तर चक्क लतादीदींनीच एसीपी प्रध्युम्न यांच्यावर बंदूक रोखून धरली होती. हा फोटो चाहत्यांना प्रचंड आवडला आणि त्यांनी त्यावर लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव केला होता. 
या फोटोत दोघंही तखळखून हसताना पाहायला मिळतायत. शिवाजी साटम यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देताना लता दीदींनी हा फोटो शेयर केला होता. 

 

 

तसंच सीआयडी मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतसुध्दा हास्यविनोद करतानाचा एक फोटो दीदींनी पोस्ट केला होता. त्यावर लिहलं होतं, माझी आवडती मालिका पुन्हा सुरु व्हावी अशी मी प्रार्थना करते.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive