लता मंगेशकर नव्हे हे आहे लतादीदींचं खरं नाव..

By  
on  

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य लक्षणं आढळून आल्याने व निमोनिया झाल्यामुळे  आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

भारताच्या कलाक्षेत्रासाठी लतादीदींनी दिलेलं योगदान अमूल्य आहे. लतादीदींनी आपल्या सुमधूर आवाजाने देशालाच नाही तर अवघ्या जगावर मोहिनी घातली. दीदींची लाखो गाणी गायली आहेत. त्यांच्या गाण्याविषयी सगळेच बोलतात, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खरं तर त्यांच्या नावाविषयी एक रंजक गोष्ट माहितीय का..

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांना लता असे नाव ठेवल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राने दिलं आहे. 

लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये होती आणि त्यांची कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून होती. त्यांनी ९०० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली होती. तसेच २० पेक्षा जास्त प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले होते. लता मंगेशकर यांचे संपूर्ण कुटुंबच संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

 

Recommended

Loading...
Share