By  
on  

जय भवानी जय शिवाजी ! सूर्यकांत मांढरे ते शरद केळकर या कलाकारांनी पडद्यावर साकारले छत्रपची शिवराय

शिवरायांस आठवावे । जिवित्व तृणवत मानावे ।
इहलोकी परलोकी रहावे । किर्तीरूपी ।।
शिवरायांचे कैसे चालणे । शिवरायांचे कैसे बोलणे ।
शिवरायांचे सलगी देणे कैसे असे ।।
शिवरायांचे आठवावे रूप ।शिवरायांचा आठवावा प्रताप 
शिवरायांचा आठवावा साक्षेप। भूमंडळी ।। 

 

फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना शिवजयंतीचे वेध लागतात. 19 फेब्रुवारीला एक वेगळाच उत्साह आणि अभिमान संचारतो. स्वराज्य स्थापनेसाठी आणि जनतेच्या सुखासाठी झटणा-या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आपण जन्म घेतला याचा प्रत्येकालाच गर्व आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण इतिहास छोटया आणि मोठ्या पडद्यावर अनेकवेळा उलगडण्यात आला. यावेळी विविध अभिनेत्यांनी छत्रपची शिवरायांची भूमिका साकारत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. 

 

पाहूया महाराजांच्या व्यक्तिरेखेतील प्रसिध्द अभिनेते

कृष्णधवल काळात अभिनेते सुर्यकांत मांढरे यांनी शिवरायांची भूमिका साकारली होती. ‘स्वराज्याचा शिलेदार’, ‘पावनखिंड’, ‘धन्य ते संताजी धनाजी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय आजही प्रेक्षकांच्या हदयावर अधिराज्य गाजवतोय. 

'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटात अभिनेते -दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय तर ठरलाच पण महेश मांजरेकर यांच्या शिवरायांच्या भूमिकेने मनं जिंकली. 

अभिनेते अमोल कोल्हे यांनी आपल्या कारकिर्दीत  अनेक ऐतिहासिक भूमिका साकारल्या आहेत. चित्रपट, नाटकं, मालिकांमध्ये त्यांनी अनेकदा शिवरायांची भूमिका साकारली आहे. राजा शिवछत्रपती, स्वराज्य जननी जिजामाता आणि आता स्वराज्यसौदामिनी ताराराणी या मालिकांतून त्यांनी पडद्यावर शिवराय साकारले.  अमोल कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी  प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळते. 

अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर यानं फत्तेशिकस्त या मराठी चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती. आजच शिवजयंतीनिमित्त प्रदर्शित झालेल्या दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड सिेनमातही चिन्मय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. 

दोन वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी द अनसंग वॉरियर सिनेमातून छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब व्यक्तिरेखा साकारुन शरद केळकरने तमाम महाराष्ट्राची मनं जिंकली. शरद केळकरला महारांजांच्या रुपातील आत्तापर्यंतची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत अभिनेता शंतनू मोघे यानं महाराजांची भूमिका साकारली होती. ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित होती.

 

. स्टार प्रवाहवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण होती. यात शिवरायांच्या शिलेदारांनी स्वराज्यासाठी दिलेलं बलिदान याची ओळख प्रेक्षकांना करुन देण्यात आली. यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता भूषण प्रधानने साकारली होती. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive