Women’s Day 2022 : महिलांभोवती गुंफलेले हे लोकप्रिय मराठी सिनेमे जरुर पाहा!

By  
on  

आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करतात.  महिलांच्या हक्कांचे रक्षण, स्त्री सन्मानतेच्या दृष्टीने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. गेल्या काही वर्षांत या दिवशी खास कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. विविध ठिकाणी स्त्री शक्तीचा जागर केला जातो. 
मराठी सिनेसृष्टीत महिलांना केंद्रस्थानी ठेऊन अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यापैकी काही लोकप्रिय सिनेमांवर महिला दिनाच्या निमित्ताने टाकूयात एक नजर. 

वजनदार 

सई ताम्हणकर आणि प्रिया  बापट या सिनेसृष्टीतल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सिनेमा आहे. महत्त्वाचं म्हणजे वजन वाढलेल्या स्यियांच्या आयुष्यावर गहा सिनेमा भाष्य करतो. त्यांना येणा-य अडचणी त्यांचे कटू-गोड अनुभव. ह्या हलक्या-फुलक्या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सांभाळली आहे. 

 

आम्ही दोघी 

मुक्ता बर्वे आणि,प्रिया बापट यांच्या आयुष्याभोवती ह्या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे.  लहानपणीच आई गमावलेली सावी म्हणजेच प्रिया बापटच्या घरी मुक्ता बर्वे ही नवी आई म्हणून येते. ही नवी आई तिच्यापेक्षा फक्त काही वर्षांनीच मोठी असते.  प्रिया बापट व मुक्ता बर्वेने आपल्या भूमिकेला न्याय दिल्याने सिनेमातलं त्याचं नातं खुप अधोरेखित होतं. एका वेगळ्या विषयावरचा हा सिनेमा मनाचा ठाव घेतो. 

 

न्यूड 

रवी जाधव दिग्दर्शित न्यूड सिनेमा खुप चर्चेचा विषय ठरला होता. अनेक आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय सिनेमहोत्सवात झळकणा-या या सिनेमावरुन वादंग निर्माण झाला होता. आर्ट कॉलेजमधील न्यूड म्हणून राहणा-या स्त्रियांभोवती या सिनेमाचं कथानक गुंफण्यात आलं आहे. वेगळ्या विषयावरच्या या सिनेमाचं बरंच कौतुक झालं. 

 

आनंदी गोपाळ 

ललित प्रभाकर आणि भाग्यश्री मिलिंद यांच्या अभिनयाने सजलेला आनंदी गोपाळ हा सिनेमा. भाग्यश्रीने यात आनंदीबाईंची व्यक्तिरेखा अगदी सुरेख साकारलीय तर गोपाळराव साकारणा-या ललित प्रभाकरचं कौतुक करु तितकचं कमी. एकोणिसाव्या शतकात हिंदुस्तानी महिलांना जिथे साधं स्वखुशीने उंबरठ्याबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, तिथे आनंदी गोपाळ जोशी नावाची अवघ्या १८ वर्षांची तरुणी बोटीने अमेरिकेला गेली. तिथे चार वर्षं राहून तिने वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला आणि ती पुन्हा हिंदुस्थानात परतली, ती पहिली भारतीय महिला डॉक्टर म्हणून!
दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी सादर कलेली ही अप्रतिम कलाकृती रसिकांना खुप भावली. 

 

हिरकणी 

 प्रत्येक आई असतेच...हिरकणी... असं म्हणत हिरकणी हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि रसिक प्रेक्षकांच्या मनात त्याने घर केलं. . छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण काळातील हे एक सुवर्णपान. छत्रपतीव  शिवरायांच्या गडावर दूध देण्यासाठी आलेली गवळण हिरकणी तान्हुल्या बाळाला घरी ठेऊन गडावर अडकते मग भुकेल्या बाळाजवळ पोहचण्यासाठी एका रात्रीत ती गड सर करते. अशी एका सामान्य आईची ही असामान्य कहाणी. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पडद्यावर हिरकणी साकारुन चाहत्यांची मनं जिंकली. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखीत हिरकणी या सिनेमाला बॉक्स ऑफीसवरसुध्दा घवघवीत य़श मिळालं.

Recommended

Loading...
Share