By  
on  

रक्षाबंधन स्पेशल: हे आहेत मराठी सिनेमातील लाडके ऑनस्क्रीन भाऊ बहीण

प्रत्येक बहीण भावासाठी रक्षाबंधनचा सण खुपच स्पेशल असतो. सिनेमांमध्येही आजवर अनेकदा या प्रेमाचा दाखला दिला आहे. मराठी सिनेमांमध्येही बहीण भावाच्या ऑनस्क्रीन जोड्या प्रेक्षकांच्या अत्यंत लाडक्या आहेत. वाचा तुमची लाडकी जोडी आहे का या यादीत

प्रिया बापट- अतुल कुलकर्णी (हॅपी जर्नी‌): भावा-बहिणीची ही जगावेगळी जोडी प्रेक्षकांना खास आवडली. प्रिया आणि अतुल हे आजच्या जनरेशनचे भाऊ बहिण असल्याने त्यांच्या केमिस्ट्रीला आपसुकच मॉडर्न टच होता. त्यामुळेच सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा या यादीत सर्वात वर आहे. 

 

श्रीरंग महाजन- सायली भांडरकवठेकर (एलिझाबेथ एकादशी): भाऊ बहिण लहान असोत वा मोठे त्यांच्यातील केमिस्ट्री कायमच हटके असते. एलिझाबेथ एकादशीमधील मुक्ता आणि ज्ञानेश या भावंडांची जोडीही त्यामुळेच हटके ठरते. परेश मोकाशी दिग्दर्शित हा सिनेमा या गोड केमिस्ट्रीसाठी कायमच लक्षात राहिल. 

गौरी वैद्य- सक्षम कुलकर्णी (दे धक्का): बहिणीच्या सुखासाठी भाऊ काहिही करू शकतो. नेमकं हेच किसना आणि सायलीच्या केमिस्ट्रीमधून दिसतं. सायलीच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तिला मदत करणारा किसना यात प्रत्येकालाच भावतो. 

अलका कुबल- अजिंक्य देव (माहेरची साडी): समस्त महिलावर्गाचा लाडका सिनेमा म्हणजे माहेरची साडी. बहिणीला वेळोवेळी सांभाळून घेणारा, तिच्यासाठी कायम ढाल बनणारा भाऊ आणि त्याच्यावर आईच्या मायेने प्रेम करणा-या बहिणीची ही गोष्ट प्रत्येकालाच खुप भावली. 

सचिन- राजेश्वरी सचदेव (आयत्या घरात घरोबा): भाऊ बहिणीसाठी काहीही करू शकतो अगदी नोकरही बनू शकतो. हेच सचिनने या सिनेमात दाखवून दिलं. बहिणीच्या आग्रहास्तव नोकर बनणा-या सचिन आणि राजेश्वरीची केमिस्ट्री त्यामुळेच आजही ताजी वाटते.

Recommended

PeepingMoon Exclusive