अभिनयाचा 'सुबोध' चेहरा, सुरुवातीला नोकरी सांभाळत नाटकांमध्ये करायचा काम

By  
on  

सुबोध भावे या नावाला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. मराठी सिनेमात सध्या ज्याचं नाणं अगदी खणखणीत वाजत आहे तो कलाकार म्हणजे सुबोध भावे.मलिका, नाटक, सिनेमा अशा तिन्ही प्रकरात सुबोधने त्याची खास ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला केवळ आवड म्हणून नाटकात काम करणारा अभियंता ते आजचा आघाडीचा कलाकार अशी सुबोधची ओळख आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

चौकटीत जे उमटतं तेच लक्षात राहतं. Pic by @golandeyogesh

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोध सुरुवातीला नोकरी सांभाळत नाटकांमध्ये काम करत असे. पण अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. मग सुबोधने नोकरीचा राजीनामा देत मुंबईची वाट धरली आणि मराठी सिनेमाला आणखी एक नायक मिळाला. 

पण सिनेमाची कोणातीही पार्श्वभूमी नसलेल्या सुबोधला हा मार्ग इतका सोपा नव्हता. सुरुवातीला नाटकांमधून काम केलं. त्यानंतर अवंतिका, पिंपळपान, आभाळमाया, कळत नकळत, का रे दुरावा, दामिनी, या गोजिरवाण्या घरात, यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. 

 

 

याशिवाय वीर सावरकर, लालबागचा राजा, पाऊलवाट, सनई चौघडे, मिशन चॅम्पियन, हृदयांतर अशा सिनेमांनी त्याची ओळख बनवली. पण सुबोधमधील अभिनेत्याला अजून काहीतरी आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारायची होती. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एक वर्ष झालं. या चित्रपटाने खूप काही दिलं, रंगभूमीच्या सुवर्णकाळाचं दर्शन घडवले, एका उत्तम कलाकृतीचा भाग असल्याचा आनंद आणि तुम्हा सगळ्यांच प्रेम आणि आशिर्वाद. सर्व प्रथम याच श्रेय जात ज्यांच्यावर हा चित्रपट आहे त्यांना व आमच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना. आणि अर्थातच आमच्या संपूर्ण संघाला. मनपूर्वक धन्यवाद आणि खूप प्रेम. @viacom18marathi @unbollywood #sunilphadatare @oakprasad @sumeetraghvan @sonalikul @parashuramivaidehi @mi_nandita @ingale_anand @vfxwaala @ajitankushparab @lochankanvinde @nachiketbarve #sudheerpalsane #santoshphutane #vikramgaikewad #aashishmhatre #apoorvamotiwale #guruthakur #milind #anandgaikwad

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

सुबोधच्या कट्यार काळजात घुसली सिनेमातील सदाशिवच्या व्यक्तिरेखेने रसिकांची वाहवा मिळवली. यानंतर सुबोध समोर आला तो बालगंधर्व सिनेमातून. सुबोधच्या राजस व्यक्तिमत्त्वाला बालगंधर्वाच्या स्त्री वेषात चार चांद लागले. यानंतर लोकमान्य - एक युगपुरुष सिनेमांमधून सुबोधने लोकमान्य टिळकांचं करारी व्यक्तिमत्त्व साकारलं. 

यानंतर सुबोधच्या वाट्याला पुन्हा एकदा बायोपिक आला. मराठी सिनेमातील सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांची व्यक्तिरेखा. या व्यक्तिरेखेने सुबोधच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम व्यक्तिरेखा साकारण्याचं समाधान त्याला मिळालं असावं. कारण या सिनेमातील सुबोधच्या अभिनयावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

निर्विवाद पणे ते अभिनयाचे शहेनशहा आहेत.त्यांच्या बरोबर काम करावं हे प्रत्येकाचं स्वप्नं असतं. माझंही होतं आणि माझ्या मातृभाषेतील,मिलिंद लेले दिग्दर्शित " AB आणि CD" चित्रपटात ते साकार झालं. कलाकारांनी कसं असावं कसं वागावं कसं रहावं आणि कसं काम करावं याचं ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. मला ही संधी दिल्याबद्दल माझ्या टीम चे मनपूर्वक आभार. @planet.marathi #ABaaniCD

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

प्रेक्षकांच्या मनात खास जागा मिळवणा-या या अभिनेत्याला पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'एकदम कडक' अभिनय करुन विविध भुमिकांमधुन प्रेक्षकांचं प्रेम कमावलेला चतुरस्त्र अभिनेता आणि दिग्दर्शक सुबोध भावेला पिपिंगमून मराठीतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . . @subodhbhave . . For More Updates Follow @peepingmoonmarathi . . #marathi #celebrity #celebrities #celebupdates #instaceleb #actress #actor #photooftheday #Mumbai #instalove #PeepingMoon #PeepingMoonMarathi #subodhbhave #birthday

A post shared by PeepingMoon Marathi (@peepingmoonmarathi) on

 

Recommended

Loading...
Share